ज्योतिषीय गणनेच्या आधारे 17 जुलै ते 25 जुलैपर्यंत बुधादित्य योग राहील. या काळात विशेषत: 4 राशीच्या लोकांना बुधादित्य योगाने धनप्राप्ती होईल. उत्पन्नात वाढ, नोकरीत बढतीचे योग होऊ शकतात.
बुधाच्या कृपेने व्यवसायात प्रगती होऊ शकते. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ मृत्युंजय तिवारी यांनी बुधादित्य योगामुळे कोणत्या 4 राशींना फायदा होईल, याविषयी दिलेली माहिती पाहुया.
मेष राशी
बुधादित्य योगामुळे सरकारी आणि खासगी नोकरी करणाऱ्या लोकांना लाभ होईल. तुमच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होऊ शकते. करिअरसाठी वेळ चांगला आहे. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेतील.
या काळात मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तर्कशक्ती वाढेल, व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतात.
मिथुन राशी
17 ते 25 जुलै दरम्यानचा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. बुधादित्य योग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने तुम्ही पूर्वीपेक्षा चांगली बचत करू शकाल. अचानक धनलाभ, घर आणि वाहनाचे सुख निर्माण होत आहे.
या काळात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब बलवान असेल, त्यामुळे विविध कामांमध्ये यश मिळणे सोपे होईल. व्यापारी वर्गाला लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कर्क राशी
बुधादित्य योग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. त्याच्या प्रभावाने तुमचे यश आणि कीर्ती वाढेल. तुमची कामे पटापट होतील. जे तुमच्यावर टीका करायचे तेच तुमची स्तुती करतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
कर्क राशीच्या विवाहयोग्य लोकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात. लव्ह लाईफसाठीही वेळ ठीक राहील. या काळात वाणीचा प्रभाव अधिक असू शकतो.
तूळ राशी
तुमच्या राशीच्या लोकांना बुध आणि रवि यांच्या संयोगाने लाभ होऊ शकतो. मालमत्तेच्या बाबतीत यश मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होऊ शकते. आयात आणि निर्यातीशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी वेळ चांगला आहे, ज्यामुळे पुढील फायदे मिळतील.
तूळ राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. बॉसशी चांगला समन्वय राहील. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. कोणतेही नवीन काम करायचे असेल तर वेळ अनुकूल आहे.