Wednesday, September 27, 2023
Homeअध्यात्मअधिक श्रावणात कोणत्या गोष्टी पाळाल? नक्की जाणून घ्या

अधिक श्रावणात कोणत्या गोष्टी पाळाल? नक्की जाणून घ्या

यंदा १८ जुलै २०२३ पासून अधिक श्रावण सुरू होत आहे. यंदा एकंदरीत ५९ दिवसांचा श्रावण असणार आहे. यात अधिक श्रावण आणि निज श्रावण यांचा समावेश आहे. यामधील अधिक श्रावणाला आता सरूवात होणार आहे.

अशात अधिक श्रावणात कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं ते आपण पाहाणार आहोत. अधिक श्रावणात मांसाहार करू नये. तसंच मद्यपान करण्यापासूनही दूर राहावं. भगवान भोलेनाथांवर अभिषेक करावा.

अधिक श्रावणात भगवान नरसिंह आणि श्रीविष्णू यांची पूजा करावी. श्रीविष्णूंचं रूप असणाऱ्या भगवान नरसिंह यांचा अवतार याच महिन्यात झाल्याचं सांगितलं जातं.

या महिन्यात भगवत गीतेचं वाचन, राम कथेचं वाचन, विष्णू सहस्त्रनाम यांचं वाचन करावं. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं दिवसातून १०८ वेळा पठण करावं.

अधिक श्रावणात एकवेळ जेवणं हे शास्त्राच्या आणि विज्ञानाच्या दृष्टीने उत्तम मानण्यात आलं आहे.

या महिन्यात दीपदान आणि ध्वजदानाला फार महत्व आहे.
या महिन्यात दानाचंही महत्व सांगण्यात आलं आहे. अधिक श्रावणात दान केल्याने मोठं पुण्य मिळतं असं सांगण्यात आलं आहे.

अधिक श्रावणात यात्र करणं, दान करणं, व्यवसायात भागिदारी करणं, वृक्षारोपण करणं, सामाजिक क्षेत्रात आपलं भरीव योगदान देणं या गोष्टी अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत.

अधिक श्रावणात विवाह करणे, मुंज करणे, गृहप्रवेश करणे, संन्यास घेणे किंवा दीक्षा घेणे, यज्ञ करणे अशी शुभ किंवा मंगल कार्य करण्यावर बंदी घातली गेली आहे.

या महिन्यात दागिने खरेदी करणे, वस्त्र खरेदी करणे, घर, दुकान,वाहन खरेदी करणे टाळावे. मात्र एखादा शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिष्याच्या सहाय्याने आभुषणांची खरेदी करू शकता. या महिन्यात गृहकलह,खोटं बोलणं, अपशब्द वापरणं टाळावं. ब्रम्हचर्येचं पालन करावं.

कोणत्याही प्रकारचं खोदकाम म्हणजेच विहीर खोदणे, तलाव खोदणे अशी कामं टाळावी.कर्ज फेडणं, शस्त्रक्रिया करणं अशी काम या महिन्यात करावी.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन