घरात जपमाळ तुटली असेल तर माळेचा हा एक मनी इथे सांभाळून ठेवा; स्वामी साक्षात घरात वास करतील!

आपण रोज सकाळी देवपूजा झाल्यावर जपमाळ करत असतो जपमाळ केल्यामुळे आपल्याला मन प्रसन्न होते व आपले मन एकाग्र होऊन जाते .जपमाळ केल्यामुळे घरातले वातावरण प्रसन्न होते व घरात सुख शांती समाधान वाटते. काही लोकांना जप माळ केल्याशिवाय करमत नाही.

कारण जपमाळ आपण रोज करतो त्यामुळे आपल्यालाही सवय झालेली असते की, एक दिवस जर जपमाळ नाही केलं तर आपल्याला असं चुकलं चुकलं असे काहीसे वाटू लागते. घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही सतत होणारी भांडणे , चिडचिड वादविवाद हे सगळे काही निघून जातील. जर आपण जपमाळ मनापासून व श्रद्धेने केली तर खरच त्याचा आपल्याला लाभ हा नक्कीच मिळतो. तसेच जप माळ करताना आपले मन प्रसन्न व मनात कोणताही विचार न आणता शांतपणे ही जपमाळ करावी.

तसेच, आपण जपमाळ करत असताना चुकून आपल्या हातातून जपमाळ तुटली किंवा निसटून पडली तर ती माळ तसेच ठेवावे पण जे तुटलेली माळ आहे ती दुरुस्त करून तसेच जपमाळ करू नये कारण ती दुरुस्त करून आपण पुन्हा आहे असे जपमाळ करू नये कारण, ती जपमाळ पूर्णपणे व्यवस्थित होत नाही.अमान्य होते.

तर मित्रांनो, आपल्या हातातून निसटून किंवा त्याचे मनी पडले असतील तर ती व्यवस्थित ठेवावे व मार्केटमध्ये किंवा मंदिरातून आपण जपमाळ नवीन आणावे व आपल्या देवघरात ठेवावे व आपण नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर व्यवस्थित व एकाग्र मन करून मनात कोणताही विचार न आणता पुन्हा सुरुवात करावी

तर मित्रांनोअसे काही लोक असतात की जे तुटलेली माळ असते तीच दुरुस्त करून पुन्हा एकदा तसंच जपमाळ करायला चालू करतात.पण तसं न करता आपण नवीन माळ घेऊन जपमाळ करावी कारण तुटलेली माळ ही खंडित झालेली असते व आपण मनापासून जप करत असलो तरी ती माळ खंडित झालेली असल्यामुळे ती अप्राप्त होते. म्हणजे ती माळ तुटली म्हणजे किंवा खूप दिवसाची किंवा गंजलेली किंवा दोरा खराब झाल्या असल्यामुळे ती माळ आपल्या हातातून तुटलेली असते पण जे तुटलेली माळ आहे त्याचे मणी आपण जपून ठेवावे.

तर मित्रांनो,ही जी जपमाळ तुटलेली आहे त्यातला एक मणी आपण तसचं ठेवायचा आहे. त्या पूर्ण माहिती एक मनी हा खूप महत्त्वाचा आहे.म्हणजे घरातले नकारात्मक विचार निघून जातील.तसेच हा मणी कोणता आहे आपण बघू तर हा मणी मेरूमनी असा आहे.तसेच मेरूमनी हा वरच्या भागात असतो म्हणजेच पूर्ण माळ असते त्यातील पहिला मनी हा मेरूमनी आहे.

मेरुमणीचा रंग लाल किंवा छोटे छोटे फुले असतात .जो पहिला मनी असतो त्या मनी पासून आपण जपमळेला सुरुवात करतो. जप करत असताना तो मणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण तसंच मंत्र म्हणत शेवटच्या मनी येऊन पर्यंत आपण तो जप तसाच चालू असतो व शेवटी तो येऊन मेरूमनीच्या मनी वर शेवट होतो .

तर मित्रांनो ,हा मनी जपून ठेवायचा आहे म्हणजेच घरात स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला व आपल्या कुटुंबावर त्याचा नक्कीच फायदा होईल हा मनी आपल्या तिजोरीत किंवा देवघरात हा मनी जपून ठेवायचा आहे. तर हा मणी जिथे आपले कागदपत्रे किंवा धन लाभ तिथे ठेवला तर अगदीच त्याचा लाभ होतो. तर हा मणी आपण नक्कीच घरी ठेवा नक्कीच स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद आहे व घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. तसेच जे उरलेले मनी आहेत ते आपण नदीत अर्पण करावे.

व दुसरी जपमाळ घेऊन यावे व तसेच रोज आपण दिवसातून आपल्याला जमेल तसे एक तरी माळ स्वामी समर्थांची नक्कीच करावी म्हणजेच आपल्या घरात वादविवाद भांडणे कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. कायम स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या परिवारावर नक्कीच लागेल व जपमाळ करत असताना आपले मन प्रसन्न ठेवूनच जपमाळ करावी ही जप माळ कोणीही करू शकते .

जपमाळ केल्यामुळे घरातले सर्व नकारात्मक विचार निघून जातील व सकारात्मक विचार येऊ लागतील व आपले घर हसत खेळत पहिल्यासारखे सुरळीतपणे चालू होईल व आपले घर आनंदमय प्रसन्नदायक वाटू लागेल.आपल्या घरात व प्रत्येकाच्या घरात स्वामी समर्थांचा वास हा नक्कीच घरभर पसरेल.

Leave a Comment