अधिक श्रावण महिन्यात जावयाला द्या ‘ही’ मौल्यवान वस्तू!

मित्रांनो 18 जुलैला श्रावण महिना सुरू होणार आहे. हा अधिक श्रावण असणार आहे आणि त्यानंतर जो एक महिना येणार आहे तो निज श्रावण असणार आहे. म्हणजे यावर्षी दोन महिन्यांचा श्रावण महिना असणार आहे. तर दोन महिने तुम्हाला नियमांचे पालन करायचे आहे. परंतु श्रावण सोमवारचे व्रत मात्र तुम्ही निज श्रावण पासून सुरू करू शकता.

म्हणजेच निज श्रावणातील तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत करू शकता. बरेच जण हे शिव महादेवांची पूजा व्रत उपवास तसेच अनेक मंत्रांचा जप देखील करत असतात. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदावी. तर अधिक महिन्यांमध्ये जावयाला अधिक महत्त्व दिले जाते आणि जावयांचे पूजन देखील केले जाते. तसेच अनेक प्रकारच्या वस्तू देखील जावयांना भेट म्हणून देतात.

काहीजण सोने-चांदी तर बरेच जण कपडे असे अनेक वान यांना देऊन ते त्यांची पूजा देखील करत असतात. तर या अधिक महिन्यांमध्ये तुम्ही जर जावयाला ही वस्तु दिले तर हे आपल्यासाठी खूपच लाभदायी ठरणार आहे. तर जावयाला वाण देण्याची प्रथा खूपच पूर्वीपासून आलेली आहे आणि अधिक महिन्यांमध्ये तर खूपच विशेष महत्त्व आहे.

तर तुम्ही ही वस्तू जावयाला वान म्हणून द्यायची आहे ती वस्तू म्हणजेच दिव्यांचे दान आहे. म्हणजेच जावयांना सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा दिवा कोणत्याही प्रकारचा दिवा अवश्य तुम्ही या अधिक महिन्यांमध्ये द्यायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नक्कीच नांदेल.

तर हे दिवे तुम्ही एक देऊ शकता दोन किंवा जास्तही देऊ शकता आणि त्याबरोबर तुम्ही कपडे वगैरे देखील घेऊ शकता. परंतु दिव्यांचे वाण मात्र तुम्ही जावयांना करायचे आहे. तर ते अधिक महिन्यांमध्ये तुम्ही अवश्य करा. तर अशी ही वस्तू तुम्ही अधिक महिन्यांमध्ये जावयाला अवश्य द्या.

Leave a Comment