हिंदू धर्मात केशराला अत्यंत महत्व प्राप्त आहे. केशर हे
अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. सर्वच शुभ प्रसंगात केशराचा होणारा वापर सार काही सांगण्यास पुरेसा आहे. केसर हे आरोग्यासाठीही अत्यंत उत्तम मानलं गेलं आहे.
गुरुवारी केशराचे काही उपाय केल्यास किंवा पूजेच्या थाळीत केशराचा समावेश केल्यास तुमची बिनसलेली कामं किंवा अगदी रखडलेली कामंही पूर्ण होतात. केशर हे भगवान श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळेच गुरुवारी केशराचे काही उपाय तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात.
नशीब तुमच्यावर रुसलं आहे असं वाटत असल्यास किंवा कामात अपयश येत असल्यास चांदीच्या वाटीत केशर घेऊन त्याचा टिळा श्रीविष्णूंच्या भाळी लावावा असं केल्याने तुम्हाला तुमच्या कामात येत असलेलं अपयश दूर होईल आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला भाग्याची साथ लाभेल.
अपार कष्ट करूनही व्यवसायात यश मिळत नसल्यास किंवा धनधान्य आणि पैशाचा तुटवडा सतत भासत असल्यास एका वाटीत थोडं केशर घ्या आणि त्यात पाणी घालून त्याला विरघळू द्या, हे विरघळलेलं केशर तुमचं ऑफिस किंवा घरात शिंपडा असं केल्याने भगवान श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते.
वैवाहिक जीवनात अडथळे येत असल्यास आणि श्रीविष्णूंकडून लवकर विवाहाचं वरदान प्राप्त व्हावं म्हणून गुरुवारी दुधात केशर मिसळून हे मिश्रण तुळस आणि भगवान श्री विष्णूंना अर्पण करावं. केशराच्या या उपायाने तुमचं लग्न जुळतं. ज्यांची लग्न होत नसतील त्यांची लग्न जुळतात. ज्योतिष शास्त्रानुसार जेवणात केशर वापरल्याने लवकर नशीब प्रसन्न होतं असं मानलं जातं.