मित्रांनो आजकाल सगळेजण खूपच घाई गडबडीत असतात. म्हणजेच प्रत्येकाचे जीवन हे व्यस्त जीवनशैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच प्रत्येक जण हा कामात इतका व्यस्त झालेला दिसून येतो की त्याचे आपल्या आरोग्याकडे लक्षही राहत नाही. म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष राहिल्याने आपल्याला मग अनेक आजारांचा सामना देखील करावा लागतो. मित्रांनो आपल्या आहारामध्ये योग्य ते पौष्टिक घटक जर आपण घेतले तर आपल्याला त्या पदार्थांचा शरीरासाठी खूपच फायदा होतो. परंतु आजकाल वेळेअभावी बरेच जण हे जंकफूढचा वापर आपल्या आहारामध्ये घेतात व त्यामुळे जे काही आपल्याला पौष्टिक घटक हवे असतात ते आपल्याला मिळत नाहीत आणि त्यामुळे आपले शरीर हे कमजोर पडते.
मग थकवा अशक्तपणा अशा अनेक समस्या आपल्याला कायम सतावत राहतात. तर मित्रांनो आज काल बरेच जण भरपूर तास मेहनत घेतात आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावर एक ताण निर्माण होतो. म्हणजेच त्यांचे डोके काही वेळेस सुन्न होते त्यांचे डोके काम करणे सोडून देते. त्यावेळेस आपणाला आपली जर बुद्धी तल्लख करायची असेल म्हणजेच बरेच विचार देखील आपल्या डोक्यामध्ये सतत येत राहिल्यामुळे एक प्रकारचा डोकेदुखीचा त्रास आपल्याला होत राहतो.
त्यामुळे डोके काम करणे बंद होते त्यामुळे कोणतेच निर्णय आपल्याला घेता देखील येत नाहीत. तर जर तुम्हाला तुमचा मेंदू काम करावा म्हणजेच तल्लख बनवावा असे जर वाटत असेल तर आज मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही दररोज केला तर यामुळे तुमची बुद्धी नक्कीच तल्लख होईल. तर हा उपाय नेमका कसा आहे करायचा आहे तसेच कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे सविस्तर जाणून घेऊयात.
तर मित्रांनो आपणाला फक्त दुधामध्ये एक चमचा हा पदार्थ घालायचा आहे. जेणेकरून आपली बुद्धी तल्लख होईल. आपली बुद्धी ही कम्प्युटर सारखी काम करायला सुरुवात करेल. तर यासाठी आपणाला लागणार आहे भोपळ्यांच्या बिया. मित्रांनो तुम्हाला भाजी मार्केटमध्ये भोपळ्यांच्या बिया किंवा दुकानांमध्ये देखील भोपळ्यांच्या बिया अवश्य मिळतील. तर या भोपळ्यांच्या बिया आपणाला दोन चमचे घ्यायचे आहेत.
यानंतर लागणार आहे अक्रोड. अक्रोड हे आपल्याला मार्केटमध्ये मिळतेच परंतु जर तुम्हाला अख्खे अक्रोड मिळाले तर अख्खे अक्रोड घेऊन ते नंतर फोडून आपण अक्रोड काढायचे आहे किंवा जर अख्खे अक्रोड मिळाले नाही तर तुम्ही जे बाजारामध्ये उपलब्ध आहे ते अक्रोड आणायचे आहे आणि ते देखील आपणाला दोन चमचा घ्यायचे आहेत.
यानंतर काजू आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहेत. मित्रांनो काजूमध्ये विटामिन ई असल्यामुळे ते आपल्या बुद्धीसाठी फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे भोपळ्यांच्या बियांमध्ये झिंक हा घटक असल्यामुळे तो देखील आपल्या बुध्दी साठी उपयुक्त ठरेल. तर असे हे तीन घटक आपल्याला दोन चमचे याप्रमाणे घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला थोडेसे हे गरम करून घ्यायचे आहेत.
म्हणजेच अक्रोड, काजू आणि भोपळ्यांच्या बिया या आपल्याला थोडे थोडेसे गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर याची पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि ही पावडर आपण एका डब्यामध्ये बनवून ठेवू शकता. तर ज्यावेळेस आपण दूध पितो म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एक ग्लास दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा ही पावडर टाकायची आहे. हे गरम दूध म्हणजे जास्तही गरम आपल्याला घ्यायचे नाही कोमट दुधामध्ये तुम्ही एक चमचा ही पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायची आहे.
हे दूध आपल्याला प्यायचं आहे. मित्रांनो हे दूध पिल्यामुळे तुमचा मेंदू कम्प्युटर सारखा काम करेल. तुमची बुद्धी तर तल्लख नक्कीच बनेल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.