वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख अत्यंत शुभ मानले जातात. बरेच जण ते घरी ठेवतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते व मन प्रसन्न राहते. हिंदू मान्यतेनुसार, श्रीकृष्णाने डोक्यावर मोराची पिसे धारण केली होती, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात मोरपंख अर्पण केल्याने जीवनात यश मिळते, अशी धार्मीक मान्यता आहे.
घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तू आणि ज्योतिषचे विविध दोष दूर होऊ शकतात. मोरपंख घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तच्या दृष्टीस पडेल अशाठिकाणी ठेवावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती वाढते. घर किंवा बेडरूमच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला मोरपंख लावावा. काही दिवसानंतर याचे सकारात्मक फळ दिसून येईल. या दिशेला मोरपंख लावल्याने घराची बरकत वाढते.जो व्यक्ती नेहमी आपल्या जवळपास मोरपंख ठेवतो, त्याचे राहू दोष कमी होतात.आकर्षण वाढवण्यासाठी मोरपंख पाकिटात किंवा खिशामध्ये ठेवावा.सरस्वती देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ मोरपंख ठेवावा. याच्या शुभ प्रभावाने ज्ञान वाढते आणि परीक्षेत यश प्राप्त होते.
घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मोराची पिसे ठेवणे शुभ मानले जात असले तरी घराच्या आग्नेय दिशेला मोराची पिसे ठेवल्याने नेहमी आशीर्वाद मिळतात.जर घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रानुसार बांधला नसेल तर त्यावर तीन मोराची पिसे लावावीत आणि खाली गणपतीचे चित्र लावावे. याने वास्तुदोष संपतो.
वैवाहिक जीवनातील भांडणे थांबण्याचे नाव घेत नसतील तर तुम्ही हे उपाय करू शकता. घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवा. यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.