मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा खूपच पवित्र महिना मानला गेलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या पूजा तसेच पूजा विधि म्हणजेच अनेक पूजा विधी करत असतो. जेणेकरून आपल्या कुटुंबावर महादेवांचा आशीर्वाद सदैव राहील. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. या महिन्यांमध्ये अनेक जण हे सोमवारचे व्रत करतात. काहीजण हे फक्त श्रावण सोमवार करीत असतात. तर काहीजण हे अनेक प्रकारचे पूजा विधी मंत्र जप करीत असतात.
अनेक लोक हे आपल्या घरा ठिकाणी असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा अर्चना करीत असतात. तसेच महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण करीत असतात. तर यावर्षी श्रावण महिना हा दोन महिन्यांचा असणार आहे. म्हणजेच 18 जुलै ते 16 ऑगस्ट हा अधिक महिना असणार आहे. तर 17 ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत नीज श्रावण असणार आहे.
तर तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत हे अधिक महिन्यात केले नाही तरी चालते. नीज श्रावणामध्ये तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत केला तरीही चालेल. तर या दोन महिन्यांमध्ये तुम्ही अशी काही कामे करायची नाहीत कारण ही जर कामे तुम्ही केला तर यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.
तर ही कामे नेमकी कोणती आहे जी आपणाला श्रावण महिन्यामध्ये करायचे नाहीत म्हणजेच दोन महिन्यांचा जो श्रावण महिना आहे यामध्ये तुम्ही नियमांचे पालन देखील करायचे आहे आणि तुम्हाला ही कामे देखील करायची नाही.
तर तुम्हाला दोन महिने व्यसन अजिबात करायचे नाही म्हणजेच जे मद्यपान करतात मांसार खातात अशा लोकांनी दोन महिने व्यसन तसेच मांसाहार खायचा नाही. तसेच घरातील महिलांचा, मोठी माणसे असतील यांना अजिबात दुखवायचे नाही किंवा त्यांचा अपमान होईल अशा गोष्टी करायच्या नाहीत. त्याचबरोबर घरामध्ये भांडणे वाद-विवाद होणार नाहीत याकडे लक्ष द्यायचे आहेत.
तसेच घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही हे देखील ध्यानात घेणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही कोणत्याही सेवा करत असाल तर त्या सेवा करत राहायचे आहेत म्हणजे त्या सेवा बंद करायच्या नाहीत. तसेच तुम्ही महादेवांची विशेष सेवा या श्रावण महिन्यामध्ये करू शकता म्हणजेच त्यामध्ये तुम्ही अनेक मंत्र जप करू शकता किंवा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करू शकता.
तर अशी ही महादेवांची सेवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करायचे आहेत. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे ही कामे तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये केला नाही तर यामुळे तुमच्या घरावर कोणतेही संकट येणार नाही. परंतु ही जर कामे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये केला तर यामुळे मात्र तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुमच्या घरावर अनेक संकटे येऊ शकतात.