संपूर्ण श्रावण महिना करा हे काम, सर्व विघ्ने होतील दूर!

मित्रांनो श्रावण हा आपल्या हिंदू धर्मामधील पवित्र महिना मानला जातो. या श्रावण महिन्यात अनेक पूजा विधी, व्रत उपवास हे करीतच असतात. तसेच महादेवांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी भक्त अगदी मनोभावेने श्रद्धेने महादेवांची सेवा करण्यामध्ये लीन होऊन जातात. अनेक मंदिरांमध्ये जाऊन ते पूजा देखील करीत असतात.

तर श्रावण महिना हा 18 जुलैला सुरू होणार आहे आणि हा महिना म्हणजेच अधिक श्रावण असणार आहे आणि नंतर जो श्रावण चालू होणार आहे तो निज श्रावण चालू होणार आहे. म्हणजेच 18 जुलैपासून श्रावणाला सुरुवात होऊन ते 15 सप्टेंबर पर्यंत श्रावण असणार आहे. म्हणजेच यावर्षी दोन महिने श्रावणाचे असणार आहेत. हे दोन महिने आपण श्रावणातील नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत.

फक्त श्रावणी सोमवार तुम्ही निज श्रावण मधील करू शकता. तर या दोन श्रावण महिन्यामध्ये म्हणजेच संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्हाला हे एक काम करायचे आहे. कारण हे काम जर तुम्ही केला तर यामुळे तुमची ज्या काही अडचणी असतील, काही संकटे असतील किंवा कोणत्याही कामांमध्ये विघ्णे येत असतील तर ते सर्व दूर होणार आहेत.

तर हे काम म्हणजेच तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र दररोज न चुकता वाचायचे आहे. म्हणजेच संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचायचे आहे. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी नक्कीच दूर होतील आणि भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल.

तर तुम्हाला देखील तुमच्या जीवनातील सर्व विघ्न, अडचणी, संकटे दूर व्हावीत असे जर वाटत असेल तर संपूर्ण श्रावण महिना तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्राचे वाचन अवश्य करा.

Leave a Comment