यंदाचा श्रावण आहे फार कष्टाचा! ‘या’ राशीच्या व्यक्तींनी घ्यावी काळजी

मित्रांनो आपले हिंदू धर्मांमध्ये श्रावण महिना खूपच पवित्र महिना मानला गेलेला आहे. अनेक प्रकारच्या विधी, व्रत उपवास केले जातात. जेणेकरून महादेव आपल्याला प्रसन्न होतील. यंदाच्या श्रावणात अधिक मासामुळे चार किंवा पाच नाही, तर आठ सोमवार असणार आहेत. त्यानुसार, 18 जुलैला सुरू होणारा श्रावण 14 सप्टेंबरला संपेल.

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या व्यक्तींसाठी यंदाचा श्रावण महिना शुभ, तर काहींसाठी अशुभ असणार आहे. अनेक राशीच्या वक्तींना श्रावणात कष्ट सोसावे लागतील.

ज्यात मकर, तूळ, वृषभ आणि कुंभ राशींचा समावेश आहे. जाणून घेऊया सांगितलंय काय.

मकर राशी
या राशीच्या व्यक्तींसाठी यंदाचा श्रावण अनेक अडचणी घेऊन येणार आहे. आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल.त्यामुळे कोणतीही गुंतवणूक अतिशय विचारपूर्वक करा. शिवाय खर्चावरही नियंत्रण ठेवा.

तूळ राशी या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात यंदाचा श्रावण काही खास घेऊन येणार नाही. उलट आपल्याला आर्थिक अडचणी सोसाव्या लागतील, प्रकृतीसंबंधी तक्रारी उद्भवली.त्यामुळे जास्त धावपळ करू नये. प्रकृती जपावी, कुटुंबीयांची काळजी घ्यावी.

वृषभ राशी
या राशीच्या व्यक्तींचा ताण श्रावणात आणखी वाढणार आहे. शिवाय आपण आजारी पडण्याचीही शक्यता आहे.
त्यामुळे शरीराची आणि मनाची काळजी घ्या. कुंभ राशी या राशीच्या व्यक्तींनाही श्रावणात काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण आपली प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. शिवाय करियरबाबत चढ-उतार पाहायला मिळेल.

आपण श्रावणात बाहेर जाणं टाळलं आणि घरूनच काम करण्यास प्राधान्य दिलंत, तर आपली अनेक संकटं दूर होतील.

Leave a Comment