मित्रांनो, झाडांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. झाडांशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. कारण झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू मिळतो. झाडांमुळे चा पाऊस पडण्यास मदत होते व जमिनीची धूप थांबते झाडे आपल्याला फळे, फुले, सावली, लाकूड, औषधे अशा कितीतरी वस्तू पुरवतात. वास्तुशास्त्रातही झाडांना फार महत्त्व आहे आणि घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण शुद्ध तर होतेच त्याबरोबरच झाडांकडे पाहून मन उत्साही व प्रसन्न होते झाडांचा आपल्या जीवनावरही खूप प्रभाव पडतो.
आणि मित्रांनो काही झाडे ही आपल्यावर शुभ प्रभाव टाकतात. तर काही झाडांचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो. काही झाडे नकारात्मक ऊर्जा पसरवतात तर काही झाडांमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते आणि काही झाडे अशी असतात की, आपल्या घरात किंवा घराच्या आसपास लावल्यास त्याचे खूप चांगले परिणाम आपल्या जीवनावर होतात.
जर ही झाडे आपोआप आपल्या घराच्या आसपास उगवली तर आपल्या जीवनासाठी हा एक खूप शुभ संकेत असतो. आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बेलाचे झाड आपल्या घरामध्ये असावे की नाही आणि जर असेल तर त्याचा काय परिणाम होतो.
मित्रांनो ते झाड म्हणजे बेलाचे झाड. ज्यांच्या घरात बेलाचे झाड असते ते व्यक्ती नेहमीच सुखी असतात. बेलाचे झाड खूप मोठे असते. ते अंगणात लावावे हे झाड दारात लावल्यास घरात सुख समृद्धी कायम राहते. बेलाचे झाड महादेवांना अतिप्रिय आहे. म्हणून जर आपण हे झाड आपल्या दारात लावले तर देवा दी देव महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट व नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. त्याबरोबरच राहू केतूच्या दुषप्रभावापासूनही आपल्या घराचे संरक्षण होते.
बेलाचे झाड हे प्रत्येक्ष शिव स्वरूप आहे. या झाडाचे केवळ दर्शन घेतल्याने केवळ स्पर्श केल्याने व्यक्तींचे अघोर पापातून मुक्तता होते. या झाडाच्या परिक्रमा घातल्यास सर्व तीर्थक्षेत्रात जाऊन प्रदक्षिणा घातल्या इतकं फळ आपणास प्राप्त होत. या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना, तपश्चर्या किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणार फळ हे अधिक पटीने वाढत आणि मित्रांनो धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे. की जी व्यक्ती केवळ 1 बेलवृक्ष लावते आणि त्याच संगोपन करते त्या व्यक्तीला 1 कोटी महादेवाचे शिवालय निर्मिती केल्या इतकं फळ प्राप्त होत. इतकं मोठं माहात्म्य या बेलाच्या झाडाचं आहे.
म्हणूनच आपणही आपल्या वास्तुच्या आसपास या झाडाची लागवड करू शकता. बेलाचे वृक्ष हे औषधी वनस्पती सुद्धा आहे आणि श्रावण महिन्यात आपण हे झाड आवर्जून लावा आणि श्रावण महिन्यातच शिव लिंगावर या झाडाची बेलपत्र नक्की वाहा. श्रावण महिन्यात जी व्यक्ती बेलाचे वृक्ष लावते त्या वृक्षाचे सांभाळ करते आणि त्यावरील बेलपत्र शिव लिंगावर वाहते. त्या व्यक्तीच्या जीवनात शांती, संतती आणि संपत्ती या गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात. तसेच बेलपत्र तो-डताना या वृक्षाला कोणतेही नुकसान पोहचणार नाही याची काळजी घ्या.
आणि मित्रांनो काहीजण झाडाचे फांदे तो ड ता त किंवा काहीजण झाड सुद्धा तो-डतात लक्षात ठेवा यामुळे वंश नष्ट होऊ शकतो. ही सर्व माहिती शास्त्र शुद्ध आहे त्यामुळे या वृक्षाची आज्ञा घेऊनच आपण बेलपत्र तोडावीत. म्हणजेच वृक्षा समोर हात जोडून दर्शन घ्या आणि मग बेलपत्र तो डू न घ्यायला हरकत नाही. वास्तुशास्त्र तसेच हिंदू ध र्म शास्त्र असं मानत की बेलाच झाड आपल्या घराच्या पाठीमागे असेल तर हे अत्यंत शुभ आहे मात्र काही कारणास्तव तुम्ही आपल्या वास्तुच्या पाठीमागे या वृक्षाची लागवड करू शकत नसाल. तर आशा वेळी आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या उजव्या बाजूकडे हे झाड असायला हवं. हे झाड डाव्या बाजूला लावू नये.
मित्रांनो जर हे झाड डावी कडे असेल तर आपल्या घरात पैसा तर येतो मात्र आलेला पैसा टिकत नाही. तसेच या झाडाखाली कोणत्याही प्रकारचे सांडपाणी जाणार नाही किंवा घाणेरड्या वस्तू वृक्षाखाली जाणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी आणि सोमवार पासून ते रविवार पर्यंत प्रत्येक वारी वेगववगळे देवता या वृक्षाखाली येऊन जप करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी स्वच्छता ठेवणं अतिशय महत्वाच आहे. तर नजर दोषापासून व कोणत्याही बाधेपासून वाचवणार हे जे झाड आहे हे झाड आपण आपल्या वास्तुमध्ये नक्की लावा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.