स्वप्नात या गोष्टी दिसणं मानतात शुभ संकेत; अचानक चमकू शकते नशीब!

श्रावण महिन्यामध्ये या काळात भगवान शंकराशी संबंधित दिसणारी स्वप्ने तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतात. श्रावण महिना संपेपर्यंत काही स्वप्ने पडणे, लकी मानले जाते.

भगवान शंकराचे स्वप्नात दर्शन होणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की स्वप्नात भगवान शंकराचे दर्शन झाल्यानं प्रगतीचा मार्ग खुला होतो. ज्या दिवशी कोणाला असं स्वप्न पडेल, त्याच दिवसापासून शिवलिंगावर नित्य जल अर्पण करावे. असे केल्याने आर्थिक संकटही दूर होते, असे मानले जाते.

भगवान शंकराला प्रिय असलेल्या महिन्यात गंगेचा किनारा पाहणे खूप शुभ मानले जाते. अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वभावाने अतिशय सद्गुणी आणि शुद्ध आहात. जर तुम्हाला स्वप्नात गंगेचा किनारा दिसला तर ते लवकर श्रीमंत होण्याचे संकेत असू शकतात. असे मानले जाते की असे स्वप्न पाहिल्याने घरातील गरिबीही दूर होते.

वास्तुशास्त्रानुसार, या काळात स्वप्नात साप किंवा नागाची जोडी दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. एखाद्या व्यक्तीला श्रावणात या गोष्टी स्वप्नात दिसल्या तर असे मानले जाते की त्याच्यासोबत लवकरच काहीतरी विशेष घडणार आहे. सोमवारी साप आणि नागाची जोडी दिसली तर वैवाहिक जीवन खूप आनंदी राहते.

श्रावण सुरू होत असताना बेडूक ओरडताना किंवा मासे पाण्यात पोहताना स्वप्नात पाहणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की हे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य लवकरच सुधारेल आणि त्याचे नशीबही चमकेल. स्वप्नात बेडकांचे ओरडणे ऐकणे हे पवित्रतेचे मानले जाते आणि माशांचे पोहणे देखील संपत्तीचे लक्षण मानले जाते.

Leave a Comment