सतत अशक्त असल्यासारखं वाटतंय? लगेचच हे पदार्थ खायला सुरू करा!

मित्रांनो,हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही, ज्यामुळे लोक अशक्तपणाचे शिकार होऊ लागतात, याचे कारण अन्न नीट खाल्ले जात नाही. अशावेळी शरीरात अशक्तपणा आहे असं वाटत असेल तर आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. जर तुमचे शरीर खूप बारीक असेल आणि तुम्हाला नेहमी अशक्तपणा येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. यानंतर आपण काही पूरक आहार घ्यावा. असे केल्याने तुमची अशक्तपणा दूर होईल.

पालेभाज्या शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्हाला नेहमी अशक्तपणा येत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. या भाज्यांचे सेवन केल्याने तुम्ही कमजोरीवर सहज मात करू शकता प्रथिने कुपोषणाची समस्या असल्यास प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

कारण प्रथिने शरीराला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतात, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो. यासाठी तुम्ही आहारात अंडी, चीज, दूध यासारख्या गोष्टींचा समावेश करा. अशक्तपणा दूर करायचा असेल तर ताज्या फळांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे आहारात केळी, लिची, सफरचंद, डाळिंब या फळांचे सेवन करावे. असे केल्याने तुम्ही कमकुवतपणावर मात करू शकता.

भरपूर पाणी प्याशरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. निर्जलीकरणामुळे ऊर्जा कमी होते आणि शरीरात पेटके येतात. अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहे. भरपूर पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसात तहान कमी लागत असली तरी लक्षात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. चांगली झोप अशक्तपणा घालवायचा असेल तर शांत आणि चांगली झोप मिळणं आवश्यक आहे.

शरीरात असलेला अशक्तपणा कमी करण्याचा हा सोप्पा उपाय आहे. ज्यामुळे तुम्हाला आराम ही मिळेल आणि थकवाही कमी होईल. थकवा आणि अशक्तपणा टाळण्यासाठी पुरेशी झोप घेण्याची महिलांना सर्वाधिक गरज असते. शांत झोपेसाठी महिला मेडिटेशनची मदत घेऊ शकतात.

अशक्तपणा दूर करण्यासाठी या गोष्टी पाळा. झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून सेवन करावे.शुद्ध तुपात कांदा भाजून घ्यावा आणि त्याचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि फुप्फुसांना फायदा होईल.लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती बळकट बनवतात. दिवसभर ऊर्जा पातळी राखण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभर्‍याचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होईल.

कामाच्या अधिक व्यापामुळे वेळेवर जेवण होत नाही. त्यामुळे जंक फूडचे सेवन अनेकजण करतात; परंतु जंक फूड खाण्याचे टाळावे. दीर्घ काळापर्यंत उपाशी राहू नये. प्रत्येक दोन ते तीन तासांच्या अंतराने थोड्या-थोड्या प्रमाणात जेवण करीत राहावे.यामुळे पचन क्रिया चांगली राहील. जेवणानंतर लगेचच झोपू नये, यामुळे जास्त आळस येतो.

Leave a Comment