Wednesday, September 27, 2023
Homeअध्यात्मदृष्ट लागली असेल तर मिळतात हे संकेत! त्यावरती हे उपाय ठरणार फायद्याचे

दृष्ट लागली असेल तर मिळतात हे संकेत! त्यावरती हे उपाय ठरणार फायद्याचे

मित्रांनो, आपल्याकडे विशेषत: लहान बाळाला दृष्ट लागू नये, म्हणून काही उपाय केले जातात. खराब नजर उतरवणे किंवा दृष्ट लागू नये, यासाठी अनेक युक्त्या करतात. हाताच्या मनगटावर आणि गळ्यात काळा धागा बांधतात, आईजवळ लोखंडी वस्तू ठेवतात, जेणेकरून वाईट नजर दोघांनाही लागू नये.

दृष्ट लागल्याचे किंवा वाईट नजर असल्याचे कसे ओळखता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हीही पुढच्या वेळेपासून सावध व्हाल.

ज्यांना कोणाची नजर किंवा दृष्ट लागते, त्यांना नेहमी थकवा, चिडचिड, अस्वस्थता यासारख्या समस्या जाणवतात. त्याला डोकेदुखीचा त्रासही होतो. याशिवाय झोपही व्यवस्थित येत नाही.

ज्यांना दृष्ट लागते, त्यांना व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागते. म्हणूनच नोकरी-धंद्यातून मिळणाऱ्या पैशांविषयी कोणाशी जास्त फुशारक्या मारू नयेत. तसेच मुलांना दृष्ट लागली असल्यास ते खूप रडू लागतात आणि खाणे-पिणे देखील बंद करतात.जर तुमच्या मुलाला दृष्ट लागली असेल तर लाल सुकी मिरची घेऊन ती मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरवा.

नंतर आगीत जाळून टाका. मिरच्या व्यवस्थित जळल्यावरच मागे वळून पहा. लाल मिरची नसेल तर लसूण, कापूस, मीठ, कांद्याची साल घेऊन मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि नंतर जाळून टाका.

जळाल्यानंतर याचा खराब वास आला तर दृष्ट लागलेली नाही आणि आला तर लागली आहे असे समजावे. त्याचबरोबर वाईट नजर टाळण्यासाठी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण सुरू करावे. केवळ ती व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब यापासून वाचेल. घराला वाईट नजरेपासून वाचवायचे असेल तर कचरा साचू देऊ नका.

सकाळ संध्याकाळ घराच्या मुख्य दारावर दिवा लावा आणि देव्हाऱ्यातही हाच नियम पाळा.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन