कार्यसिद्धीसाठी कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी समर्थांचा प्रभावी उपाय!

मित्रांनो तुमचे कोणत्याही प्रकारचे काम जर अपूर्ण राहिलेले असेल म्हणजेच कोणतेही कामांमध्ये जर तुम्हाला अपयश प्राप्त होत असेल, तुम्ही चालू केलेला उद्योगधंदा हा व्यवस्थित चालत नसेल, मार्गामध्ये अनेक अडथळे येत असतील तसेच तुम्ही दिलेले उसनवार पैसे अडकलेले असतील तर ते पैसे परत मिळवण्यासाठी देखील हा उपाय खूपच प्रभावशाली असा ठरणार आहे.

तसेच तुमचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले असेल तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल म्हणजेच कोणत्या ना कोणत्या समस्या या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला येत असतील तर या सर्व समस्या वरती स्वामी समर्थ महाराजांचा एक प्रभावी तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही हा तोडगा केला तर यामुळे तुमच्या अडकलेली सर्व कामे पूर्ण होणारच आहेत.तसेच तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होणार आहेत.

हा प्रभावी तोडगा करण्याअगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. म्हणजेच तुम्हाला गुरुवारच्या दिवशी देवघरासमोर बसायचे आहे. आपल्या स्वामींच्या प्रतिमेसमोर हात जोडून बसायचे आहे आणि एक ताम्हण घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि आपली जी काही अडकलेली कामे असतील किंवा मनातील इच्छा असतील म्हणजे कोणत्याही प्रकारची जी समस्या आहे, अडचण आहे हे तुम्ही मनोमन बोलायचे आहे आणि नंतर तुम्ही ते पाणी त्या ताम्हनामध्ये सोडायचे आहे.

म्हणजेच आपल्या मनातील इच्छा, अडचण काही आहे ते स्वामी समर्थांना बोलायची आणि या अडचणीतून आम्हाला बाहेर काढा. आपली मनातील इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करून तुम्ही ते पाणी ताम्हणात सोडायचे आहे. हा फक्त संकल्प झाला. नंतर हा संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप 108 माळी करायचा आहे.

म्हणजेच मित्रांनो 108 माळी पेक्षा कमी या मंत्राचा जप करून चालणार नाही. म्हणजेच 108 माळी जप किंवा 1008 माळी जप या उपयमध्ये तुम्हाला करायचाच आहे. 108 माळी करा किंवा १००८ माळी करा. परंतु तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. जर तुम्ही दररोज अकरा माळी किंवा 51 माळी जसे जमेल तसे करायचे आहे. परंतु पूर्ण 108 माळी होईपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप दररोज करायचा आहे.

तर अशा पद्धतीने संकल्प सोडल्यानंतर मग दररोज तुम्हाला संकल्प सोडण्याची गरज नाही. तुम्ही फक्त दररोज मग 108 माळी म्हणजे जो काही स्वामी समर्थांचा मंत्र आहे वरील सांगितल्याप्रमाणे हा मंत्र तुम्ही दररोज बोलायचं आहे. जोपर्यंत 108 माळी या मंत्राचा जप होत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे.

तर अशा प्रकारे स्वामी समर्थांचा हा प्रभावशाली तोडगा जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. तुमच्या जे काही अडकलेले पैसे असतील ते पैसे परत मिळतील. तर असा हा स्वामींचा तोडगा तुम्ही देखील अवश्य मनोभावे, श्रद्धेने, स्वामीवर विश्वास ठेवून आवश्य करा. स्वामींचे अनुभव तुम्हाला नक्कीच येईल.

Leave a Comment