6 जुलै गुरुवारी संकष्टी चतुर्थी! पंचक आणि भद्रकाळ असल्यानं ‘या’ मुहूर्तावर करा पूजा

मित्रांनो आपल्यापैकी बरेचजण हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहेत आणि ज्या त्या देवी देवतांचे व्रत उपवास हे प्रत्येक जण करीत असतात.जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी संकटे दूर व्हावे आपल्याला मार्ग मिळावा यासाठी व्रत उपवास करत असतात. तर आपल्यापैकी अनेकजण हे संकष्टी चतुर्थीचे व्रत न चुकता करीत असतात. तसेच अनेक मंदिरांमध्ये जाऊन गणपतीची आराधना, पूजा करीत असतात.

तर सहा जुलै गुरुवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. संकष्टी चतुर्थी व्रत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरे केले जाते. यंदा आषाढातील संकष्टी चतुर्थीवर पंचक आणि भद्रकाळाची छाया आहे. संकष्टीच्या व्रतामध्ये गणेशाची पूजा करून रात्री चंद्राची पूजा करून अर्घ्य दिले तरच हे व्रत पूर्ण मानले जाते.

कृष्ण पक्षात चंद्र उशिरा उगवतो, त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्राला अर्घ्य अर्पण करण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागेल. आषाढातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? गणेश पूजेसाठी शुभ वेळ आणि चंद्रोदयाची वेळ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरूवार 6 जुलै रोजी सकाळी 06.30 वाजता सुरू होत असून दुसऱ्या दिवशी शुक्रवार 7 जुलै रोजी पहाटे 03.12 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 06 जुलै रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे.

6 जुलै रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त पहाटे 05.26 ते 10.40 पर्यंत आहे. यामध्ये देखील सकाळी 07.11 ते 10.40 ही वेळ अत्यंत शुभ आहे. या शुभ काळात तुम्ही तुमच्या सोयीनुसार संकष्टी चतुर्थीची पूजा करू शकता.

गजानन संकष्टी चतुर्थीला सकाळपासून प्रीति योग तयार झाला आहे. पण पंचक आणि भद्रकाळाची अशुभ छाया आहे. या दिवशी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रीति योग आहे. भद्राची वेळ पहाटे 05.29 ते 06.30 पर्यंत आहे. ही भद्रा पाताळ लोकातील आहे. चतुर्थीच्या दिवशी पंचक दुपारी 01:38 पासून सुरू होत आहे.

6 जुलै रोजी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा असणार आहे. त्या दिवशी रात्री 10:14 वाजता चंद्रोदय होईल. त्यावेळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून व्रत पूर्ण करावे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशपूजेच्या वेळी गणपती बाप्पाला सिंदूर, दुर्वा, मोदक, लाल वस्त्र आणि पान अर्पण करावे. या 5 वस्तू अर्पण केल्याने गणेश तुमच्यावर प्रसन्न होतील.
महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. जे लोक हे व्रत करून गणेशाची पूजा करतात त्यांचे दुःख दूर होतात.

जीवनात समृद्धी, सुख, शांती येते. कामात येणारा त्रास संपतो. जीवनात चांगुलपणा वाढतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील येणाऱ्या या गुरुवारच्या म्हणजे सहा जुलैला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत अगदी मनोभावे आणि श्रद्धेने अवश्य करा. यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि ते तुमच्यावर प्रसन्न देखील होतील.

Leave a Comment