मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. आपण विविध प्रकारच्या स्वामींच्या सेवा, मंत्रजप, पारायण हे करीतच असतो. संकट काळामध्ये स्वामी महाराज प्रत्येक भक्ताच्या पाठीशी धावून येतात अशी खात्री असा विश्वास प्रत्येक भक्ताला हा असतो. त्यामुळे अनेक केंद्रांमध्ये, मठांमध्ये आपल्याला स्वामींची सेवा करीत असताना भक्त पाहायला मिळतातच.
तर स्वामींची सेवा या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे ज्या प्रकारचे आपल्याला अडचण आहे त्या त्या प्रकारच्या सेवा या वेगवेगळ्या असतात आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर आपल्या काही अडचणी असतील आणि त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा सांगितली जाते.
परंतु मित्रांनो कोणतीही तुम्ही सेवा चालू करण्याआधी स्वामींना नवस बोलणे गरजेचे आहे. म्हणजेच आपण जी सेवा करीत आहोत याचा नवस आपल्याला स्वामींना बोलायचं असतो आणि तेथून मग तुम्हाला स्वामींची सेवा करायची असते. मग ती एक महिन्याची असो, 21 दिवसांची असो किंवा अकरा दिवसांची असो तर स्वामींची सेवा सुरू करण्याआधी जो पहिला दिवस आहे हा दिवस खूपच महत्त्वाचा दिवस असतो आणि स्वामींना नवस बोलूनच तुम्हाला आपली सेवा ही चालू करायची असते.
तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचणी असतील किंवा ज्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या असतील तर यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्वामींच्या सेवा सांगितले गेलेले आहेत. तर मित्रांनो या सेवा करीत असताना तुम्ही स्वामीना नवस बोलायचा आहे. तर तो नवस कशा प्रकारे बोलायचं आहे चला तर आता जाणून घेऊयात.
तर नवस बोलण्यासाठी तुम्ही गुरुवारचा दिवस निवडायचा आहे. म्हणजेच गुरुवार हा स्वामी समर्थांचा आवडीचा दिवस आहे. तरी या दिवशी तुम्ही फुलांचा हार आणायचा किंवा फुले आणायचे आहेत. तसेच गोड पदार्थ घरामध्ये बनवायचा आहे. म्हणजेच मित्रांनो गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुम्ही देवघरासमोर स्वामींच्या प्रतिमेसमोर, मूर्तीसमोर बसायचे आहे. नंतर स्वामींच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला हार अर्पण करायचा आहे.
नंतर जे काही नैवेद्याचे ताट तुम्ही केलेले आहे ते नैवेद्याचे ताट तुम्ही स्वामींच्या समोर ठेवायचे आहे. मित्रांनो या नैवेद्याच्या ताटामध्ये एक गोड पदार्थ तुम्हाला नक्कीच बनवायचा आहे. नंतर दिवा, अगरबत्ती लावून मनोभावे स्वामींना प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर एक ताम्हण तुम्हाला घ्यायचे आहे आणि एका भांड्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचे आहे. त्या भांड्यातील एक चमचा पाणी तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि डोळे बंद करून स्वामींना प्रार्थना करायचे आहे.
म्हणजे जी काही तुमची अडचण असेल ही अडचण दूर व्हावी यासाठी मी ही स्वामी सेवा सुरू करणार आहे आणि या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये. माझी ही सेवा पूर्ण निर्विघ्नपणे पार पाडावी. अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करायचे आहे किंवा जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा देखील तुम्ही बोलून दाखवायचे आहे.
म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही स्वामींची सेवा चालू करणार आहात ते सर्व तुम्ही स्वामींना बोलायचे आहे आणि नंतर ते पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचे आहे आणि नंतर हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे आणि त्या दिवसापासून तुम्ही स्वामींची सेवा सुरू करायची आहे.
तर मित्रांनो तुम्ही कोणतीही स्वामींची सेवा करणार असाल तर स्वामींना नवस बोलणे खूपच गरजेचे आहे आणि वरील सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने स्वामींना तुम्ही नवस अवश्य बोला. यामुळे तुमची जी काही इच्छा असेल किंवा अडचणी असतील स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. प्रत्येक संकटातून बाहेर तुम्हाला काढतील आणि स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.