ज्या घरात स्वामींचे 11 गुरुवार चालू आहेत त्या प्रत्येकाने नक्की वाचा!

मित्रांनो, आपल्यापैकी बरेचजण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी स्वामींची सेवा ती अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. मित्रांनो स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास देखील प्रत्येक स्वामी भक्तांना असतोच. तर मित्रांनो गुरुवारचे जे व्रत असते म्हणजेच आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो. तसेच अनेक जण हे दररोज म्हणजे आठवड्यातून येणारा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी व्रत हे करीतच असतात. परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे? त्याची मांडणी कशी आहे? याविषयी सांगणार आहे.

मित्रांनो स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत केल्याने अनेक भक्तांना याची प्रचिती देखील आलेली आहे. तर मित्रांनो स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण जाणून घेऊया.तर मित्रांनो आपण ज्यावेळेस स्वामींचे ११ गुरुवारचे व्रत करणार आहोत त्याच्या अगोदर आपणाला संकल्प करायचा असतो. तर हा संकल्प कसा करायचा याविषयी जाणून घेऊया. तर मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस स्वामींचे 11 गुरुवार करणार आहात त्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला बुधवारी किंवा तुम्ही ज्या दिवशी गुरुवार करायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी म्हणजे गुरुवारी. बुधवारी किंवा गुरुवारी तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात जायचे आहे.

जर तुमच्या घराजवळ दत्त महाराजांचे मंदिर असेल तर त्या मंदिरात देखील गेला तरीही चालत आणि जाताना मित्रांनो आपणाला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे आहे आणि स्वामी समर्थांपुढे तुम्हाला ही खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थांना सांगायचे आहे की मी उद्यापासून म्हणजे जर तुम्ही बुधवारी केंद्रामध्ये गेला असाल तर उद्यापासून म्हणायचे. जर तुम्ही गुरुवारीच गेला असाल तर आजपासून तुमचे अकरा गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करणार आहे. तर ही सेवा मी मनोभावे करीन आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. असे आपण स्वामींना सांगायचे आहे.

तर मित्रांनो असा हा संकल्प आपल्याला मंदिरात करायचा आहे आणि घरात आल्यावरही आपणाला संकल्प करायचा असतो. तर मित्रांनो प्रथम आपणाला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही स्वामींचे 11 गुरुवारची व्रत करणार आहात त्याची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे. आणि जी काही आपली इच्छा असेल आणि आपण हे 11 गुरुवारचे व्रत का करत आहोत आपल्या नेमक्या समस्या काय आहेत या सर्व आपणाला स्वामींना सांगायच्या आहेत आणि त्यामुळेच मी अकरा गुरुवारचे व्रत चालू करणार आहे आणि या समस्यातून माझी सुटका व्हावी असे आपण स्वामींना सांगून मनोभावे नमस्कार करायचा आहे.

आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपण आकारागृहाची ओळख करायला सुरुवात करू शकतो त्यानंतर या काळामध्ये आपल्याला घरामध्ये वादविवाद करायचे नाहीत आणि शक्यतो गुरुवारच्या दिवशी जेव्हाही आपण स्वामींची पूजा हे व्रत करणार आहोत तेव्हा आपल्याला घरामध्ये वातावरण हे शांत ठेवायचे आहे त्याचबरोबर या दिवशी बाहेरचे नाही आपल्याला खायची नाही म्हणजेच बाहेर आपल्याला जेवण्यासाठी कुठेही जायचं नाही आणि घरामध्ये हे आपण जर मांसाहार करत असाल तर या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही, तर मित्रांनो असे हे काही नियम आहेत हे पाळुन तुम्ही जर अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवारचे व्रत केले तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment