तुमच्याही मनासारखे होत नसेल तर यावर स्वामींनी काय सांगितले?

मित्रांनो, प्रत्येकाच्या मनी काही ना काही ही इच्छा असतेच. म्हणजेच ही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असते. त्यासाठी मग आपण बरीच मेहनत घेतो काबाडकष्ट ही करीत असतो. परंतु काही केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा मनासारखे आपल्या जीवनामध्ये घडत नसते. त्यावेळेस आपण खूपच निराश होऊन जातो आणि आपण मग आपल्या नशिबाला तसेच देवांना दोष देत असतो.

परंतु मित्रांनो जेव्हा तुमच्याही मनासारखे होत नसेल तर यावर आपल्याला स्वामिनी काय सांगितले आहे हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्या मनासारखे होत नसेल, आपले इच्छा पूर्ण होत नसतील, कायमच आपल्याला वाईट परिस्थिती येत असेल तर या वेळेस तुम्ही कोणालाही दोष देऊ नका असे स्वामी सांगतात. जे घडत आहे हे सर्व काही स्वामी घडवून आणत आहेत.

म्हणजेच आपल्या जीवनाचा कर्ता हे स्वामी आहेत. त्यामुळे कोणालाही दोष देऊ नका तसेच वाईट देखील वाटून घेऊ नका. कारण या दुःखा नंतर आपल्याला सुखाचे दिवस देखील नक्कीच स्वामी आणणार आहेत. म्हणजेच मित्रांनो प्रत्येक गोष्टीला महत्त्व प्राप्त असते. म्हणजेच माठाला कुंभार ज्यावेळेस घडवतो त्यावेळेस त्याला महत्त्व प्राप्त होते. त्याप्रमाणेच स्वामी हे आपल्याला घडवीत असतात त्यामुळे एक दिवस नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख येणारच.

सुखदुःख हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येत असतात. त्यामुळे तुम्ही देवाचे नामस्मरण करणे अजिबात सोडू नका. जसे तुम्ही दुःखात देवांचे नामस्मरण करता देवांना बोलवता त्याप्रमाणे तुम्ही आपल्या सुखात देखील देवांचे नामस्मरण स्वामी समर्थांचे नामस्मरण अवश्य करायचे आहे आणि सुखदुःखात आपण जर देवांना विसरले नाही तर ते देखील आपल्याला विसरणार नाहीत.

आता आपल्याला सध्याला जरी अनेक प्रकारच्या अडचणी असतील तर तुम्ही निराश होऊ नका. तर आपल्या वागण्यामध्ये कोणताही बदल आणू नका म्हणजेच आपले कर्म हे चांगले ठेवा. आपल्याला सुखाचे दिवस देखील स्वामी नक्कीच घेऊन येतील. त्यामुळे नशिबाला किंवा इतर कोणत्याही व्यक्तींना तुम्ही अजिबात दोष देत बसू नका. तसेच आपले प्रयत्नही कमी करू नका.

तसेच आपल्या श्रद्धेमध्ये देखील खंड पाडू नका. तर मित्रांनो तुमच्याही जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील, तसेच मनासारखे घडत नसेल तर तुम्ही देखील हे स्वामिनी सांगितलेले वचन नक्कीच पाळा. तर तुम्हाला देखील सुखाचे दिवस स्वामी नक्कीच आणतील. म्हणजेच दुःखानंतर सुखाचे दिवस देखील आपल्या जीवनामध्ये नक्कीच येणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment