गुरु पौर्णिमेला स्वामींचे गुरुपद कसे घ्यावे? गुरु कसे करावे? संपूर्ण सोपी विधी

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्र-मैत्रिणींनो येत्या 3 जुलैला गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आपण घरच्या घरी गुरु पद कसे घेता येते ? गुरु कसे करावे? याबाबतची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो अत्यंत साधी सोपी विधी असून आपणाला हा विधी आपल्या घरी करता येतो. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कसा करायचा असतो हा विधी….

मित्रांनो सुरुवातीला याची माहिती घेऊ आपण की हा विधी या दिवशी कधी करावा? तर मित्रांनो हा विधी या दिवशी सकाळी बारा वाजायच्या आत म्हणजे आपण रोज सकाळी उठल्यानंतर सहा सात वाजता देव पूजा करतो की पूजा आटोपल्यानंतर दुपारी बारा वाजायचे आहेत हा विधी आपण करावयाचा आहे.

आपणाला लॉक डाऊन मुळे केंद्रात जाणे शक्य नाही.त्यामुळे हा विधी करणे काही जणांना अवघड वाटत आहे तर मित्रांनो हे जाणून घ्या की आपणाला हा विधी आपल्या घरात करता येतो तो कसा करावा याबद्दलची माहिती आपण पहात आहोत.

हा विधी करताना आपल्या घरी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती घेऊन ती पहिला स्वच्छ धुऊन घ्यावी आणि त्या मूर्तीला तुझा ने अभिषेक घालावा आणि फोटो असेल तर तो पुसून एखादा चौरंग घेऊन त्यावर ठेवावी.त्या पूर्वी त्या चौरंगावर पांढरा किंवा लाल रंगाचे कापड अंथरावे.

यानंतर त्या मूर्तीला किंवा फोटोला हळदीकुंकू वहावे फुले वहावीत अगरबत्ती दिवा लावावा आणि त्यानंतर सोळा वेळेला पुरुषसुक्त व 16 वेळेला श्री सूक्त वाचावे.हे पुरुष सूक्त व श्री सूक्त स्वामी समर्थांची नित्यसेवा या पुस्तकांमध्ये दिलेले आहे.

आणि हे वाचून झाल्यानंतर स्वामीं समोर हात जोडून म्हणावे की स्वामी समर्थ महाराज आज गुरु पौर्णिमे पासून आमचे तुम्ही गुरुपद स्वीकारा. आजपासून तुम्हीच आमचे माता पिता गुरु आहात. आम्हाला तुम्ही या गुरुपौर्णिमे पासून पुढील गुरु पौर्णिमेपर्यंत मार्गदर्शन करावे आणि आमच्याकडून नित्यनेमाने चांगली सेवा करून घ्या. घरातील सर्वांना सुखी ठेवा रोगराईपासून मुक्त ठेवा. अशी प्रार्थना करायची आहे.

ही प्रार्थना केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायचा आहे यानंतर तुम्हाला जमत असेल तर स्वामी चरित्र, सारामृत किंवा पारायण संपूर्ण वाचायचं आहे. त्यानंतर अभिषेक घातलेले दूध किंवा पाणी असेल ते सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचे आहे.

आणि हा विधी करण्यापूर्वी नैवेद्याचे ताट ठेवून नैवेद्य दाखवूनच हा विधी करावा. आणि हा विधी करून झाल्यानंतर हे नैवेद्य आपण घरातील सर्वांनी जरा जरा प्रसाद म्हणून खावा. नैवेद्य मधे काही तरी एखादा गोड पदार्थ करावा.अशा पद्धतीने आपण घरातल्या घरात स्वामींना गुरु करू शकता.

वरील माहिती विविध संतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.

अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला भेट देत राहा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment