मित्रांनो आपल्यातील प्रत्येकला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो परंतु काही दोष, अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते, अडचण येते, म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा.
ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही आणि मित्रांनो गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल.
स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार, स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार होय. गुरुवारी केली जाणारी कामे , सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो.
मित्रांनो हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान जरून स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा. जप माळेने हा मंत्र जप करायचा आहे.
घरातल्या स्त्रीने घरातल्या महिलेने दर गुरुवारी हे काम करावे जे हवे ते सगळे काही मिळेल घरावर कोणतीही बाधा येणार नाही. तुम्हाला माहीतच असेल कि गुरुवारचा दिवस हा स्वामींच्या दिवस मानला जातो. स्वामींना आवडता दिवस हा गुरुवार असतो.म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा.
त्यात दूध साखर किंवा गोड कोणतीही मिठाई किंवा पुरणपोळी आपल्याला शक्य असेल तसा गोड नैवेद्य गुरूवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा. जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो नंतर घरातल्या सगळ्या लोकांनी प्रसाद स्वरूपात खायचा आहे.
हे सगळे झाले की त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तिथे एक रुपया किंवा अकरा रुपये, 21 रुपये, दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे.असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे. आणि कमीत कमी अकरा महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे 11 महिन्यापर्यंत खर्च करायचे नाहीये. 11 महिन्यानंतर त्या पैशाची आपल्या देवघरात कोणतीही लागणारे आवश्यक वस्तू किंवा देवाची कोणतीही मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे.
एक रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालतो, आणि जमत असेल तर दर गुरुवारी अकरा रुपये ठेवले तरी चालतात. तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ते एक रुपया, अकरा रुपये, 21 रुपये टाकून जमा करू शकतात. पण तुम्हाला हे फक्त दर गुरुवारी करायचे आहेत.
ज्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल त्या गुरुवारी हा उपाय नाही करायचा.त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा. दर गुरुवारी आठवणीने हे एक काम घरातील महिलेने अवश्य करावे. अकरा महिने सातत्याने करावे. शुभ वार्ता मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर नक्की हा सोपा उपाय दर गुरुवारी अवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.