घराच्या ईशान्य दिशेला चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू अन्यथा होईल नुकसान!

आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे घर घेण्यासाठी, सजवण्यासाठी सर्वजण आपल्या पद्धतीनं कष्ट करतात, कल्पना लढवतात. आपण राहत असलेलं घर वास्तूशास्त्रानुसार निर्दोष असावं असाही सर्वांचा प्रयत्न असतो.

उत्तर आणि पूर्व यांमधील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोन म्हणतात.हे दिशा-क्षेत्र कोणत्याही वास्तूचे सर्वात पवित्र स्थान आहे ज्यामध्ये देवाचा निवास आहे. असे मानले जाते. घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवला पाहीजे. त्यामुळे घरात सूख, शांती आणि लक्ष्मी निवास करते. ‘ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्याचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरातही ही दिशा केवळ मंदिर किंवा पूजेसाठी वापरली जाते. वास्तूनुसार या स्थानासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

‘ईशान्य कोपर्यात कोणतीही जड वस्तू ठेवू नये. तुम्ही या ठिकाणी एखादी जड वस्तू ठेवली तर सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो, ज्यामुळे तुमचे पैसे कमी होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी जड कपाटे, स्टोअर रूम इत्यादी करणे टाळा. घरातील या भागात कधीही शूज, चप्पल किंवा कचरा गोळा करू नका. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि घरात समस्या येऊ लागतात.

घराच्या ईशान्य कोपऱ्यात चुकुनही शौचालय बनवू नये. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात आणि तुमच्या ठेवी उपचारावर खर्च होऊ लागतात. नवविवाहित जोडप्याची बेडरूम मुख्यत: घराच्या ईशान्य कोपऱ्यात बनवू नये. त्याने परस्पर संबंधांमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि अनावश्यक समस्या वाढू लागतात.

घरात समृद्धी हवी असेल तर घराच्या ईशान्य कोपर्‍यात पूजास्थान बनवावे. या ठिकाणी केलेली पूजा नेहमी देवाला मान्य असते आणि यामुळे घरातील सुख-समृद्धीही कायम राहते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या दिशेचा भाग स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा राहणार नाही. विहीर, बोअरिंग, मटका किंवा पिण्याचे पाणी यासारख्या कोणत्याही जलस्रोतासाठी हे ठिकाण नेहमीच उत्तम असते.

तुम्ही नवीन घर बांधत असाल तर घराच्या या कोपऱ्यात बोरिंग लावा किंवा जमिनीखाली पाण्याची टाकी बनवा. वास्तुनियमांनुसार ईशान्य भागात विहीर बनवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिशेने एक विहीर बनवल्याने सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळते.

Leave a Comment