वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ग्रहांचा सेनापती असून त्यास शौर्य, पराक्रम, विवाह, जमीन-वाहन याचा कारक मानले जाते. १ जुलै २०२३ मंगळ राशी परिवर्तन करून सिंह राशीत प्रवेश घेणार आहे. पुढील दीड महिना म्हणजेच २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मंगळ सिंह राशीत कायम असणार आहे. यामुळे मंगळाचा १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येणार आहे. काही राशींना कष्टात वाढ झाल्याचे अनुभव येऊ शकतात तर काहींना सोन्याहून पिवळा सुखाचा काळ वाट्याला येऊ शकतो. मंगळ गोचरसह एकूण पाच राशींना भाग्योदयाचे योग आहेत. या मंडळींना नेमका कसा धनलाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया.
मेष रास
मेष राशीसाठी मंगळाचे गोचर हे अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. येत्या काळात आपल्याला साहस व पराक्रमात वाढ झाल्याचे अनुभव येऊ शकतात. आपल्याला हातात घेतलेल्या सर्व कामांमध्ये यश व प्रगतीचे संकेत आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या मंडळींना यश लाभू शकते. नोकरदार मंडळींना ज्युनिअर्सच्या मदतीतून नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळू शकते ज्याचा थेट प्रभाव तुमच्या पगारवाढीवर सुद्धा होऊ शकतो. परदेशप्रवासाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या खरेदी- विक्रीशी संबंधित मंडळींना सुद्धा नव्या लोकांशी संपर्क वाढवण्याची संधी मिळू शकते ज्याचा मोठा लाभ होईल.
मिथुन रास
आपल्या राशीतील रवी बुधाचा योग आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांचे योग्य सादरीकरण करण्यासाठी पूरक आहे. अशात मंगळाची साथ लाभल्याने स्वतःचे विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकाल व आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवाल. नोकरी व्यवसायात लाभदायक घटना घडतील. शुक्र मंगळाचा शुभ योग आवश्यक इतका आत्मविश्वास देईल. आर्थिक समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळेल. जोडीदारासह खटके उडले तरी त्यांचे वादात रूपांतर होणार नाही.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांना मंगळ गोचर होताच वाडवडिलांच्या संपत्ती व गुंतवणुकीचा मोठा लाभ होऊ शकतो. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर मोठा लाभ होऊ शकतो अन्यथा आपण आतापासूनच एखाद्या व्यवसायात गुंतवणूक सुरु करू शकता. वडिलांचे सहकार्य मिळून तुम्हाला डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरल्याचे वाटू शकते.
सिंह रास
मंगळ गोचर होताच सिंह राशीच्या प्रगतीचा वेग वाढू शकतो. या मंडळींच्या व्यक्तिमत्वात एक विशेष लाभ प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही अत्यंत उर्जावान राहू शकाल. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी मिळू शकेल ज्याचा पुरेपूर वापर करून घ्या. समाजात तुमचा मान- सन्मान वाढू शकतो. धनाची देवाणघेवाण करताना विशेष काळजी घ्या.
मीन रास
मीन राशीला मंगळ ग्रह आयुष्यात एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला परदेश प्रवासाची चिन्हे आहेत, यात्रेत- जत्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात उत्साह वाढू शकतो. तुमच्यातील नेतृत्व कौशल्य विकसित होऊ शकते त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.