स्वामींना साकडे कसे घालावे? आपल्या मनातील स्वामींकडे कसे मागावे?

मित्रांनो, आपण प्रत्येक जण स्वामींची अगदी मनोभावे व श्रद्धेने सेवा पूजा करीत असतो. मित्रांनो आपण स्वामींच्या केंद्रांमध्ये देखील जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतो. स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवतील तसेच कोणत्याही प्रकारचे संकट ते आपल्या जीवनामध्ये येऊ देणार नाही असा भक्ताला विश्वास असतोच. तसेच स्वामी आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे आपल्याला घाबरायचे काहीच कारण नाही असा विश्वास देखील ते मनी बाळगून असतात.

तर मित्रांनो स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांवर कृपाशीर्वाद हे देतच असतात. परंतु अनेक भक्तांना असा प्रश्न असतो की, आम्ही भरपूर स्वामींची सेवा करतो, मंत्र जप करतो, वाचन स्त्रोत करतो. तरी देखील आमचे मागणे पूर्ण का करत नाहीत. आमच्या इच्छा आहे त्या पूर्ण का होत नाहीत. तर मित्रांनो ह्याच प्रश्नाचे उत्तर आपण ह्या लेखामध्ये पाहणारं आहोत.

तर मित्रांनो आपल्या इच्छा या कशा स्वामींना सांगाव्यात किंवा स्वामींना साकडे कसे घालावे यासाठी एक सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे.

तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसायचे आहे. मग तुम्ही सकाळी बसा संध्याकाळी बसा कोणत्याही वेळेस तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल तर मूर्ती समोर बसायचे आहे. त्यानंतर तुम्ही स्वामी समोर मुजरा करायचा आहे. म्हणजेच आपले दोन्ही हात जोडून स्वामींकडे साकडे घालायचे आहे.

आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा स्वामींसमोर बोलायची आहे. ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील ती देखील स्वामी समोर बोलायचे आहे आणि मला या संकटातून बाहेर काढा. मार्ग दाखवा असे स्वामींना सांगायचे आहे.

हे साकडे किंवा मागणे तुम्ही स्वामींच्या मठात जाऊन देखील करू शकता किंवा मंदिरात जसे तुम्हाला शक्य होईल तसे तुम्ही करू शकता. परंतु मित्रांनो हे दररोज करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही एखादा कोणताही शुभ दिवस ठरवून किंवा तुम्ही गुरुवारी देखील असे साकडे घालू शकता.

कारण गुरुवार हा स्वामींचा आवडता दिवस आहे. त्यामुळे तुमची मनातील इच्छा तुम्ही स्वामी समोर गुरुवारी बोलू शकता. कारण स्वामी परब्रह्म परमात्मा आहेत. त्यांना सगळे काही माहित असते.

तरी आपल्या मनामध्ये कुठे तरी एक खंत असते कि स्वामींना आपल्या मनातील बोलायचं असते. स्वामींना आपल्या मनातील काहीतरी सांगायचं असते. तर ह्या पद्धतीने तुम्ही स्वामींना आपल्या मनातील सांगू शकता. मागू शकता. साकडे घालू शकता.

अशाप्रकारे तुम्ही एखादा शुभ दिवस बघून स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती समोर बसून आपल्या मनातील इच्छा, आपल्या अडचणी स्वामींसमोर बोलायच्या आहेत आणि स्वामी त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि तुमच्या अडचणीतून देखील तुमची सुटका करतील.

तुम्ही स्वामींच्या आवडत्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी साकडे घालू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जर स्वामी समर्थांना साकडे घालायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींना साकडे घालू शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment