मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैशाची गरज ही असतेच. म्हणजेच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी तसेच आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी पैशाची आवश्यकता ही असते आणि त्यासाठी प्रत्येक जण काबाडकष्ट करीत असतो. मेहनत घेत असतो. जेणेकरून आपल्याला पैसा मिळवून तो आपण पैसा आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी वापरू. परंतु बऱ्याच वेळा काय होते की, आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील जो काही मिळणारा पैसा असतो हा पैसा आपल्याला अपुरा पडतो.
मग आपल्या घरामध्ये पैशाची चनचन निर्माण होते आणि मग पैसा अपुरा पडल्यामुळे घरामध्ये कटकटी, वाद हे सुरू राहतात आणि अशांततेचे वातावरण आपल्या घरामध्ये पसरते. मग ज्या घरामध्ये भांडणे किंवा कटकटी असतील अशा घरांमध्ये लक्ष्मी कधीच वास करत नाही. त्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही. घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल तर लक्ष्मी नाराज होते.
तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहील. घरामध्ये सुख शांती नांदेल. त्याचप्रमाणे पैशाची कमतरता कधीच तुम्हाला भासणार नाही. हा उपाय तुम्ही फक्त एक वेळेस करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता.
जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता. जर सकाळी वेळ भेटत नसेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय आयुष्य करू शकता. तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जी आपली नित्य नियमाची देवपूजा असते ही देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ११ रुपये घ्यायचे आहेत आणि हे अकरा रुपये तुम्हाला देवघरांमध्ये बरोबर मध्यभागी ठेवायचे आहेत.
म्हणजे देवघराच्या मधोमध आपल्याला आकरा रुपये ठेवायचे आहेत आणि नंतर हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून तुम्हाला विधिवतपणे त्या अकरा रुपयांची देखील पूजा करायची आहे. नंतर हे ११ रुपये तुम्हाला दिवसभर असेच देवघरांमध्ये ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करून तुम्हाला हे अकरा रुपये घ्यायचे आहेत आणि कोणत्याही गरीब व्यक्तीला तुम्हाला ते द्यायचे आहेत.
म्हणजेच फक्त रात्रभर तुम्हाला अकरा रुपये आपल्या देवघरात ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते अकरा रुपये आपल्या घरामध्ये ठेवायचे नाहीत. तर ते अकरा रुपये तुम्ही ते दान करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय फक्त एक वेळेसच करायचा आहे आणि तोही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. मग तो कोणत्याही गुरुवारी तुम्ही करा.
हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे माता लक्ष्मी नक्की तुमच्यावर प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये ती प्रवेश करते पैशाची बरकत आपल्या घरामध्ये राहते. जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आलेला पैसा हा टिकून राहतो. तर असा हा चमत्कारिक उपाय तुम्ही देखील आवश्य करून पहा. तुम्हाला देखील फरक नक्कीच येईल.