मित्रांनो आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा या असतातच आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आपल्याला वाटत असते. मग आपण त्यासाठी भरपूर मेहनत घेतो कष्ट करतो तरी देखील काही वेळेस आपल्या इच्छा या पूर्ण होत नाहीत आणि त्या तशाच मनामध्ये दबल्या गेल्या जातात. तर आज मी तुम्हाला बुधवारची स्वामींची अशी विशेष सेवा सांगणार आहे. ही विशेष सेवा तुम्ही जर केला तर यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतीलच.
त्याचप्रमाणे तुमच्या सर्व अडचणी संकटे देखील दूर होणार आहेत. स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी उभे राहतात त्यांना संकटातून बाहेर काढतात आणि त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करतात. तर आपण स्वामींच्या अनेक सेवा करत असतो. म्हणजेच अनेक मंत्रांचा जप करतो तसेच अनेक अडचणी वरती वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सांगितल्या जातात. त्या देखील करत असतो.
तर बुधवारच्या दिवशी स्वामींची ही विशेष सेवा तुम्ही करायची आहे. यामध्ये तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करू शकता. संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर म्हणजेच दिवा अगरबत्ती केल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजेच
ओम सुखनिधानाय नमः
या मंत्राचा जप आपल्याला एक वेळेस करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. तर असे हे तुम्ही बुधवारच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी करू शकता व संध्याकाळी दिवा अगरबत्ती झाल्यानंतर देवघरासमोर बसून हात जोडायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा स्वामींना बोलून दाखवायचे आहे आणि नंतर या दोन मंत्रांचा जप तुम्हाला करायचा आहे. मनोभावे या मंत्राचा जप करा. स्वामी तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील.