नमस्कार मित्र- मैत्रिणींनो
मित्र- मैत्रिणींनो तुमची मुलं ऑनलाइन अभ्यास करण्याच्या नावाखाली मोबाईलवर सारखे गेम खेळतात, त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी उत्तम अभ्यासासाठी का सोपे उपाय ची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेऊ.
मित्र- मैत्रिणींनो कोरोनाच्या भयाण संकटामुळे आजकाल सर्वच शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण, क्लासेस सुरु करण भाग पडलं आहे. करोनाच्या संकटात सुद्धा सर्व शाळा आणि तिथले सर्व शिक्षक तुमच्या मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी झटत आहेत. त्यांनाही ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने देण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात.
शाळेत शिकवायला १ तास लागतो पण तेच ऑनलाईन शिकवण्यासाठी तयारी करावी लागते. त्यासाठी ४ ते ५ तास लागतात. सुरवातीला मुल ऑनलाईन शाळा, क्लासेससाठी अवघडल्यासारखी झाली होती पण आता सर्वांनाच याचा सराव झाला आहे. या कठीण परिस्थितत मुलांनी ऑनलाईन शिक्षणासाठी स्वत:ला तयार केल याच कौतुकही वाटत.
पण मित्रांनो यातली काही मुल अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलवर सारखी गेम खेळत असतात. सिनेमा बघतात. कार्टून बघतात. त्यांच अभ्यासामध्ये आजिबात लक्ष लागत नाही. घरातील मोठ्या लोकांनी अभ्यासाबाबत काही विचारल तर चिडतात, आदळआपट करतात. एवढच नव्हे तर मोबाईलमुळे या मुलांना भुकेचीही जाणीव नाही. ग्राऊंडवर खेळण नाही की कुणाशी गप्पा मारण नाही. फक्त चिडचिड करतात.
मित्रांनो मग सर्व लोकांना एक प्रश्न असतो की आपली मुलं अभ्यास करत नाहीत. शिक्षणामध्ये ती कमी पडतात. अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही. सतत मोबाईल घेतात व मोबाईलवर अभ्यास करण्याच्या नादात ते गेम खेळत राहतात. ती खुप हज़र आहेत पण त्यांचा रिझल्ट हा कमी लागतो. शिक्षणामध्ये त्यांची आवड कमी झाली आहे अभ्यास तर मुळीच करत नाहीत.
तर मित्रांनो अशा साठी स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कशा नुसार व इतर शास्त्राच्या आधारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार आम्ही येथे एक उपाय सांगत आहोत.
मित्रांनो हा उपाय म्हणजे एक स्वामींचा मंत्रच आहे. फक्त मंत्र… तो अतिशय साधा आणि सोपा आहे. तुम्ही हा उपाय करावयाचा आहे. तुमच्या मुलांना करायला लावा. मित्रांनो हा उपाय तुम्ही ज्यांच्यासाठी करता म्हणजे तुमची मुलगी तुमचा जो मुलगा आहे त्यांनी जर हा केला तर अत्यंत लाभदायक आहे. हा मंत्र म्हणून अभ्यास होणार नाही, अभ्यास तर मुलांनाच करावा लागणार आहे.
पण मित्रांनो मुलांच अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी, त्यांचं मन अभ्यासामध्ये रमण्यासाठी आणि एकाग्र होण्यासाठी हा उपाय आपल्या मुलांना करायला लावायचा आहे. त्यांचे मन विचलित होऊ नये, त्यांचे मन एकाग्र रहावं, अभ्यासात प्रगती व्हावी, अभ्यासामध्ये गोडी लागावी, आवड निर्माण व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
मित्रांनो तुमच्या घरात जर कोणी मुलं शिक्षणासाठी असतील तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी करायचा आहे किंवा त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे. मित्रांनो यासाठी तुमच्या मुलाला-मुलीला पहाटे लवकर उठायची सवय लावा. कमीत कमी पाच वाजता तरी त्यांनी उठायला हव. आंघोळ वगैरे करून स्वामींची पूजा करावी. स्वामी समर्थ महाराजांचा नामजप करून तुम्हाला ह्या एक मंत्राची एक माळ झाली पाहिजे आहे. मित्रांनो मंत्र अतिशय साधा आणि सोपा आहे.
तर तो मंत्र असा आहे….
ॐ सरस्वतेय नमः । सरस्वतेय नमः ।
हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र मित्रांनो तुम्हाला फक्त एक माळ म्हणजे १०८ वेळा करावयाचा आहे. या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. मित्रांनो तुमच्या मुलाला किंवा मुलीला सकाळी लवकर उठून हा मंत्र बोलायला सांगा आणि संध्याकाळी झोपतांनाही या मंत्राची एक माळ करून झोपायला सांगा.
मित्रानो हा जर तुम्ही मंत्र जप सुरू केला तर तुमच्या मुलांमध्ये एकाग्रता वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि त्यांचा अभ्यास खूप छान होईल. आपण नंतर त्यांना हा नामजप हा मंत्र वाढवायला सांगा. हा मंत्र जाप वाढवल्यानंतर त्यांचं मन एकाग्र होईल आणि त्यांचा अभ्यासामध्ये मन लागेल. दुसऱ्या गोष्टी त्यांच्या मनात ही येणार नाहीत. अभ्यासाबद्दल त्यांच्या मनात गोडी निर्माण होईल आणि ते उत्तम अभ्यास करतील आणि उत्तम रिझल्ट आणतील. तर मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा हा मंत्रजपाचा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
या प्रकारच्या समस्यांबरोबरच घरातील इतर हि समस्यांवर काही उपाय तोटके याची माहिती घेण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.