आजपासून सूर्याचे दक्षिणायन आरंभ; या राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचे योग!

वृषभ राशी
आज तृतीय चंद्र मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य देईल.काही मित्र भेटीचे प्रसंग येतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास, नातेवाईक भेट संभवते. कुटुंबीय आनंदी असतील.

मिथुन राशी
शुक्र मंगळ आता कर्केत असून आज चंद्रदेखील तिथेच आहे. प्राप्ती झाली तरी खर्चात टाकणारे वातावरण आहे. चंद्र व्यावसायिक यश देईल. कोणालाही कठोर बोलणे टाळा. एकूण व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या चांगला काळ.

कर्क राशी
कर्क राशी स्थानातील चंद्र सुखकारक आहे. आर्थिक स्थितीवर चांगला परिणाम करेल. वैवाहिक जीवन आनंदी आहे. गुरूचे पाठबळ अध्यात्मिकदृष्ट्या लाभ देईल. प्रकृती जपून काम करा.

सिंह राशी
चंद्र व्ययात आणि भाग्यात गुरू म्हणजे परदेश प्रवास, मित्र भेट असा संकेत आहे. भाग्य स्थान जागृत आहे. शुभ कार्य घडतील. खर्चाचे प्रमाण वाढले तरी काळजी नको.

कन्या राशी
नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र जोडीदाराची भेट घडवून आणेल. तसेच आर्थिकदृष्ट्या चांगला काळ. आरोग्यात सुधारणा होईल.

कुंभ राशी
बुद्धिवादी असलेली कुंभ रास, आज मंगळ चंद्र योगामुळे उत्तम भाग्य योग आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. लिखाणमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम काळ.

Leave a Comment