वारंवार लघवीला का होते? यावर घरगुती उपाय वाचा आताच

बर्‍याच लोकांना वारंवार लघवीला जायची इच्छा होत असते. वारंवार लघवी होणं ही एक मोठी समस्या बनते. कारण त्यामुळे नित्यकर्मांमध्ये समस्या उद्भवतात आणि रात्रीची झोपही अपूर्ण राहते. बर्‍याच घटनांमध्ये लोकांना लाज वाटते आणि अस्वस्थताही जाणवते. वारंवार लघवी होणं ही एक सामान्य परिस्थिती नसून, त्याचाशी काही चिकित्सकिय कारणं निगडित आहेत.

डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय), मूत्रमार्गाद्वारे गळती, प्रोस्टेट वाढ, किडनी स्टोन, गर्भधारणा, ओटीपोटात गाठ, अतिसक्रिय मूत्राशय आणि औषधांच्या नकारात्मक प्रभाव याचा यामध्ये समावेश आहे. एवढंच नव्हे तर जास्त प्रमाणात मद्यपान, चिंता, तसंच अनियंत्रित मधुमेह ही कारणंदेखील असू शकतात.

जर आपल्याला दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळा लघवी करण्याची आवश्यकता वाटत असेल तर वारंवार लघवी येण्याशी संबंधित आजार उद्भवू शकतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. असे काही घरगुती उपचार आहेत जे वारंवार लघवीच्या समस्येपासून मुक्त करू शकतात. विशेष गोष्ट अशी आहे की या उपायांचा शरीरावर कोणताही हानिकारक प्रभाव पडत नाही.

उपाय

तीळ आणि गूळ
तीळ आणि गूळ प्रत्येकी एक एक चमचा एकत्र करून खा. रोगाची लक्षणं अदृश्य होईपर्यंत हा उपाय करा. तिळात असणारे घटक शरीरातील संक्रमण कमी करतात आणि या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.

मेथी
10-15 मेथीचे दाणे बारीक करून पूड बनवून त्यात एक चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा मध मिसळा आणि ते खा. दिवसातून एकदाच ही पेस्ट वापरा. मेथीमध्ये रासायनिक संयुगे असतात जे लघवीच्या समस्येवर विजय मिळवू शकतात.

दही
दररोज सकाळी किंवा दुपारी 1 वाटी दही खा. दह्यामधील नैसर्गिक प्रतिजैविकं शरीरात असलेल्या हानिकारक जिवाणूंचा नाश करण्यास मदत करतात. हे पचनसंस्था आणि मूत्रपिंडदेखील निरोगी ठेवतात. यामुळे लघवीशी संबंधित समस्या देखील दूर होतात.

दालचिनी
दालचिनीचे सेवन केल्याने मूत्रपिंड निरोगी राहतं, ज्यामुळे लघवी वारंवार होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. दररोज 3 ते 4 वेळा दालचिनीची पूड आपल्या आहारातून घ्या.

आवळा
आवळा सेवन केल्याने मूत्राशयाचा संसर्ग कमी होतो आणि ते मजबूत बनते. यामुळे वारंवार लघवी होण्याची समस्या कमी होते. आवळा बारीक वाटून त्यात मध घाला. हे मिश्रण केळ्यासोबत खाल्ल्यास जास्त फायदा होतो.

डाळिंबाची साल
जीवनसत्व सी आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध डाळिंब मूत्राशयाचे जिवाणूंपासून संरक्षण करतात. त्यामधील अँटीऑक्सिडंट्स विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करतात. जीवनसत्त्व सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि संसर्गाविरूद्ध लढाई सुलभ करते. डाळिंबाची साल बारीक वाटून पेस्ट बनवा, त्यात अर्धा चमचे पाणी घालून हे मिश्रण पाणी किंवा दुधात मिसळून प्या.

Leave a Comment