भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा आनंद, सौभाग्य, सौंदर्य, सौहार्द, विवाह यांचा कारक मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असेल तर त्याला सर्व सुख, सौभाग्य, प्रेम, आनंद मिळतो, असं मानलं जातं. मात्र याउलट जर शुक्राचा दोष असेल तर त्या व्यक्तीला खूप अडचणींचा सामना करावा लागतो.
असं मानलं जातं की, शुक्राचा दोष असेल तर ती व्यक्ती गरिबीत राहते. याशिवाय वैवाहिक जीवनातील समस्या, कौटुंबिक कलह अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. जर हे दोष असतील तर त्यावर उपाय केले गेले पाहिजेत.
शुक्र दोष कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने काही उपाय सांगण्यात आलेत, पाहुयात ते काय आहेत.
जाणून घेऊया शुक्र दोषाचे संकेत
1] कुंडलीत शुक्राच्या कमकुवत स्थितीमुळे व्यक्तींना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींची पाठ गरिबीही सोडत नाही.
2] शुक्र दोष व्यक्तीचे आकर्षण हळूहळू कमी होऊ लागते.
3] कुंडलीमध्ये शुक्र दोष असेल तर त्या संबंधित व्यक्तीला स्त्री सुख मिळत नाही.
याशिवाय वैवाहिक जीवनात एक ना एक समस्या कायम राहते.
4] कुंडलीत शुक्र कमजोर असल्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या, लिव्हर दुखणे, हात-पाय दुखणे इत्यादी समस्या उद्भवतात.
5] कुंडलीत शुक्राची स्थिती कमकुवत असेल तर व्यक्ती दारू, जुगार, धुम्रपान यासारख्या गोष्टींच्या आहारी जाण्याची शक्यता अधिक असते.
या मंत्राचा जाप करावा
कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत करण्यासाठी शुक्र बीज मंत्र “ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः” या मंत्राचा दररोज जप करावा. तसंच तुम्ही ओम शुक्राय नमःचा जप करू शकता.
या गोष्टी कराव्या दान
कुंडलीमध्ये जर शुक्राची स्थिती मजबूत करायची असेल तर पांढऱ्या वस्तूंचं दान केलं पाहिजे. यामध्ये दही, दूध, चीज, खीर, कपडे, तांदूळ याचं दान करणं फायदेशीर ठरतं.