घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हे उपाय करा!

मित्रांनो जेव्हा आपण एखादी घर बांधतो किंवा आपण ज्यावेळी नवीन घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्या घरामध्ये ज्या पद्धतीने रचना तयार केलेले आहे म्हणजे ते घर आपल्या वास्तुशास्त्रानुसार बनवलेले असावे यामुळे आपल्याला वास्तुदोषाचा सामना करावा लागत नाही. परंतु मित्रांनो आपण कितीही योग्य पद्धतीने घर बांधले किंवा आपली वस्तू बांधली तरीही त्यामध्ये अनेक त्रुटी राहतातच.

म्हणूनच मित्रांनो त्याचा परिणाम आपल्याला थोड्या वेळानंतर म्हणजेच काही वर्ष निघून गेल्यावर भोगावा लागतो आणि मित्रांनो जेव्हा आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतो तेव्हा त्याचा सामना संपूर्ण घराला आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाला करावा लागत असतो.

तर मित्रांनो आपण आपल्या ज्योतिष शास्त्राचे आणि वास्तुशास्त्राचे मदतीने त्यामध्ये काही सांगितलेले उपाय जर आपण आपल्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये केले तर यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष निर्माण झालेले आहे ते लवकरात लवकर दूर होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये जी नकारात्मकता आहे तीही लवकरात लवकर निघून जाण्यास मदत होते.

तर मित्रांनो आज आपण आपले शास्त्रामध्ये सांगितलेले असेच काही छोटे उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हे उपाय अगदी सोपे आणि त्याचबरोबर अत्यंत प्रभावी असे आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये हे उपाय नक्की करू शकतो.

तर मित्रांनो आपल्या वास्तु संबंधित असलेल्या अनेक समस्या दूर करण्यासाठी सर्वात पहिला जो उपाय आपण करू शकतो. तो म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे म्हणजेच आपल्या घराचे जे मुख्य दार आहे, म्हणजे आपल्या घराचे जे प्रवेशद्वार आहे. त्यावर मित्रांनो आपल्याला सिंदूरच्या सहाय्याने किंवा कुंकवाच्या साह्याने एक स्वास्तिक काढायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढला तर यामुळे घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर होते आणि हा स्वस्तिक काढल्यानंतर पुन्हा नकारात्मकता वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये असणार वास्तुदोष दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी अशा पद्धतीने एक स्वस्तिक घराच्या मुख्य दरवाजावर नक्की काढावा.

त्याचबरोबर मित्रांनो जर घरामध्ये स्वयंपाक घर म्हणजेच आपले घराचे जे किचन असते त्या संबंधित काही दोष असतील किंवा आपले स्वयंपाक जर चुकीच्या दिशेला असेल तर मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या स्वयंपाक घराची जी आग्नेय दिशा आहे. त्या आग्नेय दिशेला एक छोटासा बल्ब नक्की लावू शकतो. मित्रांनो पांढऱ्या किंवा लाल रंगाचा बल्ब आपल्याला या आपल्या स्वयंपाक घरामध्ये आग्नेय दिशेला लावायचा आहे. यामुळे आपल्या स्वयंपाक घरा संबंधित जे काही वास्तुदोष आहे ते लवकरात लवकर दूर होतात आणि त्याचबरोबर स्वयंपाक घरामध्ये असणारी नकारात्मकता ही यामुळे दूर होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो जर उत्तर किंवा पश्चिम दिशेला असेल तर अशावेळी मित्रांनो आपण जी काळ्या घोड्याची नाल असते ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे. मित्रांनो यामुळे घरावर कोणाची वाईट नजर होत नाही आणि त्याचबरोबर नकारात्मकता ही आपल्या घरापासून दूर राहते.

त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये नकारात्मकता निर्माण झाली असेल आणि त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वास्तु संबंधित अडचणी असतील तर अशावेळी आपण आपल्या घराचा जो उत्तर पूर्व कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये एक कलश स्थापन करायचा आहे. मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार कलश हे भगवान गणपती यांचे स्वरूप मानलेले आहे.

म्हणूनच मित्रांनो आपण जर आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये छोटासा कलश स्थापन केला तर यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे ती दूर होते आणि वास्तु संबंधित सर्व समस्या दूर होतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले हे काही छोटेसे उपाय आहेत हे तुम्ही तुमच्या घरामध्ये आजपासूनच करायला सुरुवात करा.

यामुळे मित्रांनो घरामध्ये कसल्याही पद्धतीचा वास्तुदोष निर्माण झालेला असेल किंवा घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता असेल तर या सर्व अडचणींपासून तुमची सुटका होईल तर असे हे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment