कार्य सिद्धीसाठी कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी स्वामींचा प्रभावशाली असा तोडगा!

मित्रांनो प्रत्येकालाच काही ना काही आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी या येतच असतात. काही संकटे आपल्यासमोर उभी राहतात आणि या संकटातून बाहेर कसे पडावे हे आपल्याला सुचत नाही. मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींचे भक्त आहेत. स्वामींची सेवा अगदी मनोभावे ते करीत देखील असतात. केंद्रामध्ये किंवा घरच्या घरी जसे शक्य होईल तसे ते स्वामींची सेवा, मंत्र जप करीत असतात.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींचा असा एक प्रभावशाली तोडगा सांगणार आहे हा जर तोडगा तुम्ही केला तर तुमच्या अडचणी, तुमचे कोणतेही काम पूर्ण होईल. तर मित्रांनो कार्य सिद्धीसाठी हा खूपच प्रभावशाली असा तोडगा आहे. म्हणजेच मित्रांनो आपल्या घरातील कोणाचे लवकर लग्न जमत नसेल, अडथळे निर्माण होत असतील किंवा नोकरीमध्ये तुम्हाला अडथळे येत असतील तसेच कोणाची प्रगती होत नसेल, कितीही मेहनत घेऊन जर यश प्राप्त होत नसेल, तुमचा उद्योग धंदा व्यवस्थित चालत नसेल, मुलांना प्रगती होत नसेल, तसेच जर तुम्हाला पैशाचे अडचणी असतील किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नसेल किंवा उसनवार दिलेले पैसे परत मिळत नसतील तर या सर्वांवर हा खूपच स्वामींचा प्रभावशाली चमत्कारिक असा तोडगा आहे.

हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तुमच्या समस्या नक्कीच स्वामी महाराज दूर करतील. तर हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. म्हणजेच तुम्हाला कोणताही एक वार पकडून तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर बसायचे आहे. ताम्हण घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडसं पाणी घ्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा असेल, अडचण असेल ही सर्व स्वामींना सांगायचे आहे आणि नंतर स्वामींना नमस्कार करून ते आपल्या हातातील पाणी तुम्ही ताम्हनामध्ये सोडायचे आहे.

हा संकल्प केल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच तो मंत्र म्हणजे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला ही सेवा दररोज चालू ठेवायची आहे. तर मित्रांनो ही सेवा करत असताना तुम्ही जो स्वामींचा मंत्र म्हणणार आहात हा मंत्र तुम्हाला 108 माळी म्हणायचा आहे. मग तुम्ही दररोज कितीही माळी बोला. परंतु जोपर्यंत 108 माळी किंवा १००८ माळी हा मंत्र जप होत नाही तोपर्यंत तुमच्या अडीअडचणी किंवा मनातील इच्छा पूर्ण होणार नाहीत. तुमचे काम पूर्ण होणार नाही.

तर मित्रांनो तुम्ही दररोज 51 माळी बोला किंवा आठ माळी बोला परंतु स्वामींचा हा मंत्र जप तुम्हाला 108 माळी किंवा 1008 माळी पूर्ण होईपर्यंत बोलायचा आहे. संकल्प फक्त पहिल्या दिवशी सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही मंत्राचा फक्त जप करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो स्वामींची सेवा करा. त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न सुटतील. तुमच्या अडचणी दूर होतील. संकटे दूर होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

Leave a Comment