शनीची वक्री चालही ‘या’ पाच राशींना ठरणार शुभदायी!

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला न्यायदेवता मानले जाते. कर्मानुसार फळ देणारे देव अशी शनिदेवांची ओळख आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १७ जानेवारी २०२३ मध्ये शनीने राशी परिवर्तन करून ३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश केला होता आणि आता १७ जून रोजी शनी आपली चाल बदलणार आहे. शनी कुंभ राशीत उलटी चाल खेळणार आहे आणि ४ नोव्हेंबरपर्यंत वक्री राहणार, असे मानले जाते. असं म्हणतात की शनीची ही वक्री चाल राजयोगसुद्धा बनविणार आणि याचा शुभ प्रभाव पाच राशींवर दिसून येणार आहे. त्या कोणत्या पाच राशी आहेत, जाणून घेऊ या.

मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांना वक्री शनी चांगला धनलाभ देणार आहे आणि या राशींच्या लोकांना भरपूर पैसा मिळणार आहे. या राशीच्या लोकांची चांगली सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट होणार, असे मानले जाते. असं म्हणतात की या राशीच्या लोकांची आर्थिक संकटे दूर होऊ शकतात आणि व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल शुभ असणार आहे आणि या राशीच्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की नोकरीच्या ठिकाणी या लोकांची प्रतिष्ठा वाढू शकते. असं म्हणतात की या लोकांना अपार धनलाभ होण्याचा योग आहे आणि त्यांना जोडीदाराचे सहकार्य लाभणार आहे.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये आर्थिक फायदा होऊ शकतो, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांची पगारवाढ होऊ शकते आणि आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. मिथुन राशीला चांगले दिवस येणार आहेत, असे मानले जाते.

सिंह
असं म्हणतात की सिंह राशीसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार. इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होणार आणि व्यवसाय करणाऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात सिंह राशीच्या लोकांना पैशाची कमतरता भासणार नाही.

मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची वक्री चाल या मकर राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. अपार धनलाभ होऊ शकतो, असे मानले जाते. असं म्हणतात की वरील राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.

Leave a Comment