स्वामींची सेवा करण्याचा सोपा मार्ग कोणता?

स्वामींची सेवा करण्याचा अगदी सोपा मार्ग आहे आणि जर तुम्हाला स्वामींची सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही हा मार्ग म्हणजेच सोपा उपाय करू शकता. हे सोपे काम करू शकता म्हणजे तुम्हाला कोणतीही सेवा करण्याची गरज नाही. बऱ्याच यावेळेस काय होतं की ही सेवा ती सेवा या गोष्टीसाठी ही सेवा ते हवं असेल तर ती सेवा इच्छापूर्तीसाठी ही सेवा हे सगळ योग्य आहे. हे सगळं करून बऱ्याचशा लोकांना अनुभव सुद्धा येतात आणि लाभ सुद्धा होतात. परंतु जे दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात.

व्यापारी असतात नोकरी धंदेवाले असतात किंवा गृहिणी असतात ज्यांना दिवसभर सकाळ-संध्याकाळ वेळ नसतो एवढी सेवा करण्याचा, पारायण करण्याचा किंवा काहीतरी वाचन करण्याचा किंवा भरपूर सारे मंत्रजप करण्याचा वेळ नसतो तर त्यांनी काय करावं यांच्यासाठीच स्वामींचा एक सोपा मार्ग आहे. स्वामी सेवेचा सोपा मार्ग आहे. परंतु हा मार्ग म्हणजे हे काम. त्याच लोकांनी करायचं ज्यांना इतर सेवा करायचं जमत नाही परंतु ज्यांना सकाळ-संध्याकाळ वेळ आहे जय पंधरा-वीस मिनिटं किंवा अर्धा तास काढून व्यवस्थित सेवा
करू शकत असाल तर त्यांनी तीच सेवा करावी जी त्यांनी घेतलेली आहे किंवा त्यांना दिली गेलेली आहे.

केंद्रातून मठातून तर ती सेवा करावी बऱ्याचशा वेळेत त्या सेवेतून ही लाभ होतातच बऱ्याचशा लोकांना पारायण करून सुद्धा इच्छापूर्ती झालेले आहेत अनुभव आलेले आहेत. परंतु आजचा जो सोपा मार्ग आहे तो अगदी सोपा आहे. त्या म्हणजे तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाहीये. फक्त श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही हा मार्ग आवडला आणि सेवा केली तरी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि या मार्गाला चालण्यासाठी तुम्हाला फक्त रोज एक माळ स्वामी समर्थांचा जप करायचा आहे.

तुम्हाला दुसर काहीच करायचं नाही. तुम्ही एक वेळ ठरवून घ्या सकाळची किंवा संध्याकाळी आणि संध्याकाळी जरी तुम्हाला वेळ नसेल तर रात्री जेवण झाल्यानंतर आणि झोपण्याच्या आधी जो मधला वेळ असतो तर त्या वेळेला हात पाय तोंड धुवुन तुम्ही देवघरासमोर स्वामीं समोर बसा. अगरबत्ती लावा त्यानंतर माळ घ्या आणि माळेने श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप करा. कमीत कमी एक माळ करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या माळी करता येतील तेवढ्या केल्या तरी चालेल तीन करा 5 करा 11 करा 21 करा.

परंतु एक माळ जरी केली दिवसातून तरी तुमची सेवा होते असे नाही की तुम्हाला पारायणच करायचे आहे किंवा खूप सारे वाचन करायचे आहे खूप मंत्र जप करायचा आहे असं काहीच नाही तुम्ही जर एक माळ जप केला तरी तो खूप आहे. फक्त तो मनोभावाने श्रद्धेने झाला पाहिजे असं नाही की बसलो आणि लवकर लवकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे बोलून उठून गेलो श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. कारण स्वामी नाही वाटलं पाहिजे की त्यांची सेवा होते आहे.

तर तुम्हाला ही स्वामींची सेवा जमत नसेल वेळ असेल तर तुम्ही सुद्धा अशी सेवा करू शकता. फक्त दिवसातून एक माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून करू शकतात. पण सकाळी, दुपारी, संध्याकाळी करा किंवा वेळच नाही तर मग रात्री जेवण झाल्यानंतर आणि झोपण्याच्या आधी जो मधला वेळ असतो त्यावेळेत तुम्ही करू शकता.

Leave a Comment