नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपणाला पित्ताचा त्रास होतो याचबरोबर आम्लपित्त ऍसिडिटी यामुळे आपण अस्वस्थ होतो. पित्तामुळे गॅसेस वाढणे, अपचन डोके गरगरणे, सातत्याने मळमळ होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात आणि यामुळे आपण आजारी पडतो कुठलेही काम करण्यास मन धजावत नाही आपण तंदुरुस्त राहत नाही. अशा अनेक अडचणी तयार होतात. यामुळे आपली तब्येत सातत्याने बिघडत जाते.
मित्रांनो हे आम्लपित्त ऍसिडिटी कशामुळे वाढते. तर याची अनेक कारणे आहेत की ज्यामुळे हे वाढत जाते. उदाहरणात म्हटले तर आपल्या जेवणाच्या अवेळा, पुरेशी झोप न घेणे, मनावरील ताण तणाव, कामाची शेडूल, मसाले पदार्थांचा अधिक वापर अशा अनेक नाना विविध कारणांनी आपली पित्त सातत्याने वाढत असते.
मित्रांनो ही वाढणारे पित्त तसेच आपणा ला होणारा त्रास काही क्षणात थांबवण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय कमीत कमी खर्चात तसेच घरातील वस्तूंवर अवलंबून असल्याने अगदी विनामोबदला म्हणा असे काही उपाय सांगत आहोत ते खालील प्रमाणे…
पहिला उपाय :
पुदिना हा आपल्या पहिल्या रूपातील मुख्य घटक आहे. पुदिना हा आपणाला घरच्या घरी अथवा घराजवळच्या शेजारी बाजारात सहज उपलब्ध होऊ शकतो. अगदी दोन ते पाच रुपयात पुदिनाची पेंडी आपणाला सहज मिळते.पुदिना हा घटक आपल्या पित्तासाठी ऍसिडिटी साठी खूप महत्त्वाचा आहे यामुळे आपली पित्त तात्काळ कमी होते तसेच ऍसिडिटी जवळपास रहातच नाही. याबाबतची कृती अशी करावी पुदिना एक तरी उकळून चहासारखा प्यावा.
अथवा नुसता पुदिनाची चार ते पाच पाने चघळून खाल्ली तरी चालतील. त्याचबरोबर आपल्या अन्नपदार्थांमध्ये ही पुदिना चा वापर करा. शक्य असल्यास पुदिनाची चटणी वारंवार खा.यामुळे पित्त कमी होईल ऍसिडिटी निघून जाईल पोटही आपले साफ व स्वच्छ राहील आणि आपणाला यामुळे सतत उत्साही राहून कुठल्याही कामाला मोठी गती येईल.
दुसरा उपाय :
दुसऱ्या उपायांमध्ये मुख्य घटक आहे तो म्हणजे आवळा. याबाबतची कृती अशी करावी की आवळा चूर्ण एक चमचा वर घेऊन ते एका ग्लास मध्ये गरम पाणी घेऊन त्याचे मिश्रण रोज सकाळी द्यावे. यामुळे आपली पित्त कमी होऊन करपट ढेकर, मळमळणे पोटातील जळजळ कमी होते.असे शक्य नसल्यास मोरावळा किंवा आवळा कॅन्डी अशा पदार्थांचा ही आपण वापर करू शकता अथवा आपल्या जेवण पदार्थांमध्ये आवळा वापरून जेवण बनवू शकता त्यामुळे आपला पित्ताचा बराचसा त्रास कमी होईल.
तिसरा उपाय :
धने जिरे आणि बडीशेप या सर्वांची मिळून एक पूड तयार करावी. आणि हि पूड आपल्या जेवणानंतर अर्धा चमचा सेवन करावी. यामुळे आपली पचनक्रिया चांगली होते. त्यामुळे वाढणारे पित्त कमी होते. यामुळे इतरही त्रास कमी होतात.
हे सर्व उपाय करत असताना मित्रांनो आपण पाण्याचे प्रमाण नेहमी योग्य प्रमाणात त्या शक्य तितके जास्तीत जास्त पाणी प्या.
यामुळे आपल्या शरीरातील जे उत्सर्जित पदार्थ असतात ते तात्काळ बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे ही कुठल्याही प्रकारची पित्त तात्काळ कमी होते. याच बरोबर आपली झोप ही योग्य प्रमाणात घ्यायला विसरू नका.
मित्रांनो या लेखातील माहिती आपणास नक्कीच आवडेल. आणि आवडल्यास ही माहिती शेअर करा आणि सोबतच लाईक करायला ही विसरू नका. त्याचबरोबर आरोग्याच्या इतरही समस्यांसाठी घरगुती उपाय याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला सातत्याने भेट देत राहा.