रोज सकाळी उठल्यावर स्वामींना करा ही प्रार्थना कोणतेच संकट येणार नाही

मित्रांनो आपल्यापैकी बरेचजण हे स्वामी समर्थांचे सेवेकरी आहेत. स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात तसेच आपल्या अडचणीतून, संकटातून आपणाला मार्ग दाखवतात असा विश्वास प्रत्येक भक्ताला हा असतोच. त्यासाठी प्रत्येक भक्त, सेवेकरी स्वामींच्या सेवेमध्ये अगदी मग्न होऊन जातात. म्हणजेच अनेक केंद्रांमध्ये तसेच मठांमध्ये जाऊन देखील स्वामींची सेवा ते करत असतात.

आपल्यापैकी बरेच जण हे कामानिमित्त खूपच व्यस्त असल्यामुळे ते घरच्या घरी देखील स्वामींची सेवा करीत असतात. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला साथ देतील असा प्रत्येक भक्तला विश्वास हा असतोच आणि स्वामींवर विश्वास ठेवणे हे देखील खूपच महत्त्वाचे आहे.

तर तुम्हाला देखील तुमचा प्रत्येक दिवस हा चांगला जावा, कोणत्याही अडचणी येऊ नयेत, संकटे येऊ नयेत आपले हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही दररोज न चुकता सकाळी उठल्यावर स्वामींना एक प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना जर तुम्ही स्वामींना केली तर तुमचा प्रत्येक दिवस हा आनंदाचा आणि सुखाचा असणार आहे.

तर मित्रांनो तुम्ही दररोज उठल्यानंतर उठल्या उठल्या तुम्ही हात जोडून स्वामींचे नामस्मरण करायचे आहे आणि स्वामींच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे बोलायचे आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांना प्रार्थना करायचे आहे की हे स्वामी महाराज मी तुमच्या दर्शनाने तुमच्या नावाने माझ्या दिवसाची सुरुवात करत आहे. त्यामुळे माझा दिवस हा आनंदाचा आणि सुखाचा जाऊ दे.

तसेच मला माझ्या या संपूर्ण दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण किंवा संकट अजिबात येऊ नये. तरी काही संकट किंवा अडचण आले तर त्यातून मला मार्ग दाखवा. माझा दिवस हा खूपच आनंदी जाऊ दे. तसेच माझ्या कुटुंबीयांवर, माझ्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये. हाती घेतलेल्या प्रत्येक कामांमध्ये मला यश प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करायची आहे आणि मनोभावे आणि श्रद्धेने प्रार्थना करायचे आहे आणि स्वामींना नमस्कार करायचे आहे.

अगदी मनोभावे, श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही ही प्रार्थना स्वामींना करायचे आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला आपला प्रत्येक दिवस हा चांगला जावा, सुखाचा जावा, कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असे जर वाटत असेल तर तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर स्वामीना अशी प्रार्थना नक्की करा. तुमचा प्रत्येक दिवस हा आनंदाचा जाईल आणि तुमच्या कुटुंबीयांवर तसेच तुमच्यावर स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद कायम राहील.

Leave a Comment