मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये पैशाची आवश्यकता ही असतेच. म्हणजेच आपल्या कुटुंबियांतील सदस्यांच्या गर्जा भागवण्यासाठी पैसा लागतो. पण त्यासाठी आपण प्रत्येक जण मेहनत ही घेतच असतो. परंतु काही वेळेस आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. म्हणजेच भरपूर मेहनत घेऊन देखील पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत राहतो. पैशाची कमतरता आपल्या घरामध्ये जाणवू लागते आणि मग त्यामुळे कुटुंबीयांतील सदस्यांमध्ये सतत वादावादीचे प्रसंग उद्भवतात.
त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. बरकत राहत नाही. तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही शुक्रवारी करायचा आहे. हा उपाय केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल घरामध्ये पैशाची बरकत राहील. ज्या काही पैशासंबंधीत अडचणी असतील त्या सर्व नक्कीच दूर होणार आहेत.
तर हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला पैशासंबंधीत अडचण दूर होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही करायचा आहे. तर हा उपाय करत असताना लक्ष्मीनारायणाची अगदी मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून पूजा विधी करायचे आहे. तर मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्ही कोणतेही वाईट विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाहीत.
तर मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. म्हणजेच संध्याकाळी तुम्ही स्नान करायची आहे आणि स्नान करून झाल्यानंतर एक पाठ घेऊन त्या पाठावरती गुलाबी किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पाठावरती एक पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती मूर्ती त्या पाठावरती ठेवायची आहे.
नंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले, गोड मिठाई हे सर्व माता लक्ष्मी आणि विष्णू नारायण यांना अर्पण करायचे आहेत. दिवा अगरबत्ती लावायचे आहे आणि श्रद्धेने लक्ष्मीनारायणाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये बरकतीसाठी, पैशासंबंधी अडचणी दूर व्हाव्यात, सुख-समृद्धी नांदण्यासाठी, लक्ष्मीच्या सदैव घरामध्ये वास राहावा अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मीनारायण हृदय स्त्रोत तुम्हाला वाचायचे आहे.
अगदी मनोभावेने श्रद्धेने हे स्त्रोत तुम्हाला वाचायचे आहे. नंतर आपली पूजा विधी झाल्यानंतर लक्ष्मीनारायणाची आरती करायची आहे आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला खीर करून ती खीर लक्ष्मीनारायणाला अर्पण करायचे आहे. नंतर पूजा झाल्यानंतर तुम्हाला तांब्याच्या कशातील जे पाणी भरलेले आहे हे पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे. तुमची पैशासंबंधीत अडचण जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत दर शुक्रवारी तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे. यामुळे तुम्हाला मित्रांनो फरक नक्कीच जाणवेल आणि घरामध्ये आपल्या बरकत कायम राहील. लक्ष्मीचा वास राहील. त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहील. तर असा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.