वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम राशींवर आणि लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ग्रहांच्या स्थानामुळे निर्माण झालेल्या विशेष संयोगाला राज योग म्हणतात. अनेक राजयोग असतात त्यातीलत एक म्हणजे विपरीत राजयोग. राजयोग तयार झाल्यामुळे राशीच्या लोकांना जीवनात यश मिळते.
कुंडलीतील सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील स्वामी इतर दोन ग्रहांपैकी कोणत्याही एका ग्रहाशी जुळतात तेव्हा हा विपरित राजयोग तयार होतो. विपरीत राजयोग निर्माण होतो म्हणजेच सहाव्या घराचा स्वामी आठव्या किंवा बाराव्या घरात असतो. बाराव्या घराचा स्वामी सहाव्या किंवा आठव्या भावात असताना हा योग तयार होतो.
यावर्षी 50 वर्षांनंतर ग्रहांच्या राशी बदलामुळे विपरीत राजयोग तयार झालाय. यावेळी 4 राशीच्या कुंडलीमध्ये 50 वर्षांनंतर विपरीत राजयोग तयार झाल्याने लाभ मिळणार आहे. यामध्ये आर्थिक लाभासह काही राशींचे नशीबाचे दरवाजे उघडणार आहे. पाहूयात या राशी कोणत्या आहेत.
मेष रास
या राशीच्या लोकांना विपरीत राजयोगाचा लाभ होणार आहे. कामात तुमची प्रगती होणार असून तुम्हाला त्यामध्ये भरपूर यश मिळणार आहे. शिवाय व्यवसायात देखील फायदा होण्याची चिन्ह आहेत. तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
सिंह रास
ग्रहांच्या राशी बदलामुळे सिंह राशीलाही या विपरीत राजयोगाचा लाभ मिळणार आहे. अचानक या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. नोकरीच्या सुवर्ण संधी मिळू शकतात. याशिवाय नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची संधी आहे. कोर्ट कचेररीचे निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात. संपत्ती आणि समृद्धीचा लाभ होईल. कुटुंबातील अडचणी दूर होतील.
तूळ रास
या राशीच्या व्यक्तींना विपरीत राजयोग आर्थिकदृष्या फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. कोणत्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील तर लवकरच परत मिळू शकतात. भौतिक सुख आणि संपत्तीतही वाढ होईल. मालमत्तेवरील वाद संपुष्टात येणार आहे.
मकर रास
या राशीच्या लोकांना विपरीत राजयोगाचा चांगला फायदा होणार आहे. पदाची प्रतिष्ठा वाढणार असून तुमच्या कामाचं देखील कौतुक होणार आहे. तुम्हाला तुमच्या सर्व कामात इतरांची मदत होणार आहे. तब्येत सुधारणार असून जुनाट आजारातून सुटका मिळेल. मनात ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होऊ शकणार आहेत.