साडेसातीच्या पहिल्या टप्प्यातच मेष राशीत बुधादित्य योग, या तीन राशींचं होणार भलं

राशीचक्रात एका ठरावीक कालावधीनंतर ग्रहाची स्थिती बदलत असते. त्यामुळे ग्रह बदलला की त्याची फळही तशीच मिळतात. पण गोचर कुंडली आणि वैयक्तिक कुंडलीचा ताळमेळ बसला की चांगली फळं मिळतात. ग्रहमंडळात सूर्याला राजाचा दर्जा आहे. त्यामुळे सूर्याच्या स्थितीवर राज अनुभूती मिळते. 14 एप्रिलला सूर्यदेव मेष या आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहेत. तर बुद्धीदाता बुध ग्रह हा 7 मे रोजी याच राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे प्रभावी बुधादित्य योग तयार होणार आहे. 14 एप्रिलला पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत सूर्यदेव 14 मे पर्यंत असणार आहेत. तर 7 मे रोजी बुध ग्रह याच राशीत प्रवेश करत असल्याने 7 दिवस बुधादित्य योग राहील. चला या सात दिवसात कोणत्या राशींना लाभ मिळेत ते जाणून घेऊयात

 

या तीन राशींना मिळणार लाभ

मिथुन : या राशीच्या एकादश स्थानात सूर्य आणि बुधाची युती होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला या युतीचे चांगले परिणाम दिसून येतील. नोकरीतील काही अडचणी दूर होतील. इतकंच काय तर काही अपूर्ण इच्छाही या कालावधीत पूर्ण होतील. संपत्तीत पैसे गुंतवले असतील तर त्याचाही लाभ मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ व्यतित कराल.

 

कर्क : या राशीच्या जातकांना बुधादित्य योग फायदेशीर ठरणार आहे. दोन्ही ग्रहांची युती ही कर्म स्थानात होणार आहे. यामुळे ठरवलेली सगळी कामं चुटकीसरशी पूर्ण होताना दिसतील. समाजात मानसन्मान मिळेल. तसेच पगारवाढही मिळेल. वडीलांची पूर्ण साथ मिळेल. या कालावधीत आर्थिक स्थिती चांगली राहील. शेअर बाजारात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.

 

कुंभ : या राशीच्या जातकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यात या राशीच्या तिसऱ्या स्थानात सूर्य आणि बुध एकत्र येत आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना नोकरी आणि उद्योगधंद्यात लाभ मिळू शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित कराल. आई वडिलांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. अध्यात्माकडे कल वाढेल. धार्मिक प्रवास करण्याचा योग जुळून येईल.

Leave a Comment