आर्य चाणक्य हे एक थोर विद्वान, प्रसिद्ध कुटनीती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी लिहिलेला चाणक्य नीती नावाचा ग्रंथ आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतो. या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. ज्यामध्ये पत्नी-पत्नीचं नात कसं असावं? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? आदर्श पती कोणाला म्हणावं? आदर्श पतीची लक्षण काय आहेत, राजाचे आपल्या प्रजेसोबत संबंध कसे असावेत? आपला शत्रू कोण आहे? आपला खरा मित्र कसा ओळखावा अशा एक ना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये चर्चा केली आहे.
आर्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीमध्ये असे काही गुण असतात, ज्यामुळे त्याने कितीही मेहनत केली तरी त्याला अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीनं आपल्यामधील ते गुण ओळखून त्यांना दूर केलं पाहिजे, तर आणि तरच त्यांना यश मिळू शकेल. आर्य चाणक्या यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात.
आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही कितीही प्रयत्न करा मात्र जर तुमच्यामध्ये शिस्त नसेल तर तुमचे सर्व प्रयत्न अपूर्ण आहेत. तुमच्या आयुष्यात शिस्त असल्याशिवाय तुम्हाला यश मिळणं अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात शिस्तप्रिय असलं पाहिजे. चाणक्य पुढे सांगतात जशी तुमच्या आयुष्यात शिस्त महत्त्वाची आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे संयम जर तुमच्याकडे संयम नसेल तर तुमचा धीर लवकर खचतो आणि तुमच्या हातात आलेलं यश तुमच्यापासून दूर जातं. त्यामुळे आयुष्यात मानसानं संयम ठेवला पाहिजे. संयमी मानसाला एक न एक दिवस यश नक्कीच मिळतं.
व्याक्तीच्या आयुष्यात जेवढं महत्त्व शिस्त आणि संयमाचं आहे, तेवढंच महत्त्व प्रामाणिकपणाचं आहे. तुमच्या कष्टाला प्रामाणिक पणाची जोड जर असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.