तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकार तुम्हाला एक उत्तम संधी देतेय.
याद्वारे अगदी कमी गुंतवणुकीतून तुम्हाला व्यवसाय सुरु करता येईल. ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रा’विषयी आपण बोलतोय. ज्यांची संख्या देशात सातत्याने वाढतेय. तुमच्यासाठी ही कमाईची मोठी संधी ठरू शकते. या केंद्रांद्वारे लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे.
आतापर्यंत देशात 9,400 हून अधिक प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. त्यांची संख्या आणखी वाढवण्यावर सरकार भर देतेय. केंद्र सरकारने देशात आणखी 2,000 जनऔषधी केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिलीये. यापैकी 1,000 केंद्रे ऑगस्ट 2023 पर्यंत उघडली जातील, तर उर्वरित 1,000 केंद्रे वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होतील. या औषध केंद्रांमध्ये 1800 प्रकारची औषधे आणि 285 मेडिकल डिव्हाइस ठेवले जातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जनऔषधी केंद्रांवर 50 ते 90 टक्के कमी किमतीत औषधे उपलब्ध आहेत.
प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची फीस फक्त पाच हजार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे केंद्रे उघडण्यासाठी अर्जदाराने डी. फार्मा किंवा बी. फार्मा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. यासोबतच तुमच्याकडे केंद्र उघडण्यासाठी सेंटर सुरु करण्याची पुरेशी जागा असावी. ज्याचे क्षेत्रफळ सुमारे 120 चौरस फूट ठरवण्यात आलेय. अर्ज प्रक्रियेदरम्यान, विशेष श्रेणी आणि विशेष क्षेत्राच्या अर्जदारांसाठी शुल्कात सूट देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडल्यानंतर सरकारकडून प्रोत्साहन रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. 5 लाख किंवा कमाल 15,000 रुपयांपर्यंतच्या औषधांच्या मासिक खरेदीवर 15 टक्के प्रोत्साहन देण्याचा नियम केंद्रात करण्यात आलाय. विशेष श्रेणी किंवा क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या खर्चाची भरपाई म्हणून सरकारकडून अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम म्हणून दोन लाख रुपयांची एकरकमी रक्कम दिली जाते.
अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात
आधार कार्ड फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पॅन कार्ड मोबाईल नंबर पत्त्याचा पुरावा
अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला janaushadhi.gov.in या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल. नंतर होम पेजवरील मेनूमधील Apply For Kendra ऑप्शनवर क्लिक करा. नवीन पेजवरील Click Here To Apply या ऑप्शनवर क्लिक करा. आता साइन इन फॉर्म उघडेल, ज्याच्या खाली Register now ऑप्शन निवडा. यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल, त्यात मागितलेली माहिती भरा. आता ड्रॉप बॉक्समध्ये राज्य निवडा आणि आयडी-पासवर्ड सेक्शनमध्ये कन्फर्म पासवर्ड टाका. यानंतर नियम आणि अटींवर टिक करा आणि नंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. आता PM जन औषधी केंद्रासाठी तुमची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.