हुशार असूनही अपयश हाती का येते ?

आयुष्यात प्रत्येकाला यश हवे असते. यश प्राप्तीसाठी मनुष्य अनेक प्रयत्न करत असतो. यश कोणाला नको असते ? यश प्राप्तीसाठी आपण अधिक मेहनत घेतो.पण आयुष्यात अनेकदा अशा गोष्टींवर वळण घेते ज्यामुळे अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

आपण कितीही बुध्दीमान असलो आणि तरीही आपल्याला यश मिळालेच तर ते अधिक काळ आपल्याकडे टिकत नाही. चाणक्य म्हणतात की, माणूस त्याच्या आयुष्यात अशा बऱ्याच चुका करतो ज्यामुळे तो कितीही हुशार असला तरी अपयशच येते असे का होते जाणून घेऊया त्याबद्दल..

काही माणसं ही त्यांच्या आयुष्यात आतल्या गाठीची असतात. त्यांना सतत एकट राहायला आवडते. आपले सुख दुःख ते इतर कोणालाही वाटत नाही. त्यामुळे यश मिळूनही ते अपयशासारखेच राहतात.

आपली परिस्थिती ही सतत बदलत असते. अनेकदा आपल्याला एकाच परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय असते. त्यामुळे परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती सहसा ते जुळवून घेत नाही.

पुस्तकातल्या ज्ञानामुळे तुमच्या डोक्यात भर पडेल पण तुमचं जगाच्या ज्ञान किती आहे हे देखील महत्त्वाचे असते. वाचाल तर वाचाल असे म्हणतात खरे पण व्यावहारिक पातळीवर ज्ञान असणे देखील गरजेचे असते.

बरेचदा कोणतीही नवीन गोष्ट करताना आपला विश्वास डळमळीत होतो. कोणते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपला स्वतःवर विश्वास असणे अधिक महत्त्वाचे असतो. तो नसेल तर यश हे अपयशा सारखेच.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment