अनेकवेळा आपल्याकडे पैंसे येतात पंरतु तो टिकत नाही. तुमच्या सोबत सुद्धा असे होत असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र दोष असू शकतो. तुमची सुद्धा आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली असेल त्यासोबतच त्वचे संबंधित समस्या वाढत असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सारख्या सारख्या समस्या येत असतील तर तुमच्या कुंडलीमधील शुक्र ग्रहाचा प्रभाव कमी झालेला असू शकतो. शुक्र आपल्या संपत्तीचा, सौंदर्याचा, नातेसंबंधांचा, आनंदाचा आणि समृद्धीचा कारक आहे. जेव्हा तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत असतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि जीवनशैलीवर स्पष्टपणे दिसून येतो.
हिंदूधर्मानुसार, तुमच्या कंडलीतील शुक्र जर मजबूत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक किंवा त्वचेच्या समस्या होणार नाही. ग्रंथांमध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र मजबूत होतो. शुक्र मजबूत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. जेवढे मजबूत तुमच्या कुंडलीतील शुक्र मजबूत होत असेल त्यावेळी तुमच्याकडे भरपूर संपत्ती येते.
जर तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत असेल तर त्याची लक्षणे शरीरात आणि जीवनात वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतात
त्वचेच्या समस्या : डाग, पुरळ, कोरडी त्वचा, संसर्ग, कोंडा, चेहऱ्यावरील चमक कमी होणे.
आरोग्य समस्या : हार्मोनल असंतुलन, अशक्तपणा, कमी पांढऱ्या रक्त पेशी, प्रजनन आरोग्य समस्या.
वैवाहिक जीवनातील समस्या : वैवाहिक जीवनात कलह, मुलांच्या आनंदात अडथळा, नातेसंबंधांमध्ये कटुता.
आर्थिक समस्या : आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे, सतत पैशाचे नुकसान.
स्वभावात बदल: चिडचिडेपणा, आत्मविश्वासाचा अभाव, निराशा, नैराश्य.
दहीचा वापर करा….
दही हा शुक्र ग्रहाचा कारक आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास शुक्राशी संबंधित दोष दूर होऊ शकतात. दररोज आंघोळीपूर्वी 1 चमचा ताजे दही घ्या आणि चेहऱ्यावर किंवा समस्या असलेल्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. जर संपूर्ण शरीरात समस्या असेल तर आंघोळीच्या पाण्यात 3-4 चमचे दही घाला आणि त्या पाण्याने आंघोळ करा. जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर केसांना दही लावा आणि 15 मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून एकदा, शक्यतो शुक्रवारी, फक्त साबण न लावता पाण्याने आंघोळ करा.
वैवाहिक आणि प्रेम जीवन सुधारण्यासाठी – ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी सतत 40 दिवस दह्याने आंघोळ करावी. ज्यांचे वैवाहिक जीवन चांगले चालत नाही, त्यांनी शुक्रवारी त्यांच्या जोडीदारासोबत दही खावे. शुक्रवारी पती-पत्नीने पांढरे कपडे आणि चांदीचे दागिने घालावेत.
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी – शुक्रवारी गरिबांना दही आणि साखर खाऊ घाला. चांदीच्या भांड्यात दही खा आणि “ओम द्रम द्रम द्रौम सह शुक्राय नमः” शुक्र मंत्राचा जप करा. आंघोळीनंतर दररोज ताजे गुलाबपाणी वापरा, यामुळे शुक्र ग्रह मजबूत होईल आणि आकर्षण वाढेल.
शुक्र ग्रहाला मजबूत बनवण्याचे उपाय
रत्न घाला : ओपल किंवा हिरा घाला, जर शक्य नसेल तर चांदीच्या अंगठीत मोजोनाइट दगड घाला.
दान: पांढरे कपडे, तांदूळ, दही, साखर, अत्तर आणि चांदी दान करा.
शुक्र-राहु दोषासाठी : गुरुवारी संध्याकाळी ५ ते ७ च्या दरम्यान मंदिरात नारळ, दूध आणि पांढरे लोणी अर्पण करा.
नशा टाळा: मद्यपान आणि धूम्रपान शुक्र ग्रहाला कमकुवत करतात, म्हणून त्यांच्यापासून दूर रहा.