चाणक्य म्हणतात जगातील कोणतीच स्त्री तीच्या बद्दल या दोन गोष्टी आपल्या पतीला कधीच सांगत नाही

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान होते. ते एक थोर राजनिती तज्ज्ञ, कूटनिती तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये माणसानं आपलं जीवन कसं जगावं, कुठे बोलावं, कुठे बोलू नये. काय केल्यानं नुकसान होऊ शकतं? काय केल्यानं फायदा होतो. आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? राजाची कर्तव्य काय आहे, विद्वान कोणाला म्हणावं अशा एकना अनेक प्रश्नांची उत्तर या आपल्या ग्रथांमध्ये आर्य चाणक्य यांनी दिली आहे. आजच्या काळात देखील अनेकांना जीवन जगत असताना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरतो.

 

आर्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. आर्य चाणक्य यांनी पत्नीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आर्य चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी महिला आपल्या पतीवर कितीही प्रेम करत असल्या, त्यांचा त्याच्यावर कितीही विश्वास असला तरी त्या सांगत नाहीत. आज त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.

 

आर्य चाणक्य म्हणतात महिला या मुळातच काटकसरी स्वभावाच्या असतात. आपला संसार सुखात जावा, संकट काळामध्ये आपल्याला काहीतरी आधार असावा यासाठी त्या पैशांची बचत करतात. त्या आपल्या पतीच्या नकळत काही पैशांची बचत करतता. याबद्दल त्या आपल्या पतीला कधीच सांगतं नाहीत. पतीला कल्पाना देखील नसते. मात्र जेव्हा घरावर एखादं संकट येत तेव्हा हीच आर्थिक मदत त्या आपल्या पतीला देतात.

 

दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या महिलेला लग्नाआधी एखादा दुसरा पुरुष आवडत असेल, मात्र काही कारणांमुळे त्याच्याशी लग्न होऊ शकलं नाही, तर महिला आपल्या पतीला आपल्या भूतकाळाबद्दल कधीच सांगत नाहीत कारण त्यांना आपला संसार मोडण्याची भीती असते. असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही जीवन जगताना मार्गदर्श ठरतात.

Leave a Comment