हिंदू धर्मात वसंत पंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हा सण सरस्वती देवीला समर्पित आहे. या दिवशी माता सरस्वती देवीची पूजा केली जाते. या वर्षी वसंत पंचमीचा हा उत्सव फेब्रुवारी महिन्यामध्ये आला आहे. या वर्षी वसंत पंचमी ही ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोणातून देखील महत्त्वाची आहे. कारण या वर्षी वसंत पंचमीच्या दिवशी शनि देव आपली चाल बदलणार आहेत
शनि देवांचं नक्षत्र परिवर्तन
ज्योतिष शास्त्रानुसार दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे, आणि याच दिवशी शनि देव पूर्वभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. शनिच्या या नक्षत्र परिवर्तनाचा बाराही राशींवर वेगवेगळा परिणाम होणार आहे. मात्र काही अशा राशी आहेत, त्यांच्यासाठी शनि देवाचं हे नक्षत्र परिवर्तन अतिशय शुभ असणार आहे. या राशींच्या लोकांना या काळात मोठा लाभ मिळणार आहे. जाणून घेऊयात नेमक्या या राशी कोणत्या आहेत त्या.
मिथुन रास – शनि देवांचं नक्षत्र परिवर्तन मिथुन राशींच्या लोकांच्या पथ्यावर पडणारं आहे. या काळात मिथुन राशींच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. जे लोक नोकरी करतात त्यांच्या प्रमोशनचा योग असून, व्यावसायात देखील मोठा फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात देखील आनंदी वातावरण राहणार आहे.
कर्क रास – शनि देवांचं नक्षत्र परिवर्तन कर्क राशींच्या लोकांसाठी अत्यंत लाभादायक राहणार आहे. जे लोक नोकरी करतात त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच पगार वाढ देखील मिळू शकते. व्यावसायात देखील मोठा फायदा होणार असून, आर्थिक उत्पन्न चांगलं राहणार आहे.
मकर रास – मकर राशीसाठी सुद्धा शनि देवांचं नक्षत्र परिवर्तन अतिशय शुभ आहे. या काळात मकर राशींच्या लोकांना उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अनके दिवसांपासून अडलेलं एखादं काम या काळात पूर्ण होऊ शकतं. पगार वाढण्याची शक्यता आहे.