माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असेही म्हटले जाते. असेही म्हटले जाते. या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात. गणपती बाप्पाकडे सुख- समृद्धीसाठी प्रार्थना करतात. आजचा गणेश जयंतीचा शुभ दिवस कोणत्या राशीसाठी सुखाचे क्षण घेऊन येणार आहे, हे आपण जाणून घेऊ
धनु राशीच्या व्यक्तींना कसा जाईल आजचा दिवस
आजच्या दिवशी आपले काम कसे पूर्ण होईल याकडे तुमचे जास्त लक्ष राहील आणि तुम्ही ते पूर्ण करून घ्याल. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत. त्या गोष्टीसाठी फार संघर्ष करावा लागणार नाही. अगदी सहज मार्ग मिळेल. उंच भरारी माराल. आजच्या शुभ दिवशी कुटुंबात शांतता कशी नांदेल ते पाहा. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य साथ देईल. स्थावरची कामे मार्गी लागतील. चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. कंजूषपणा दाखवू नका. अगदी मोजकेच बोलाल.
धनु राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य
व्यवसायातील आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाला कामात येणारे प्रस्ताव चांगले असतील. आर्थिक लाभ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल.
धनु राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य
आजच्या दिवशी धनु राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. नव्या नोकरीची संधी मिळेल. समोर आलेल्या संधीचा फायदा करून घ्याल.
धनु राशीचे आजचे नातेसंबंधांविषयीचे राशिभविष्य
धनु राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात आजच्या दिवशी सुख-शांती नांदेल, वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. भावंडाशी असलेला दुरावा कमी होईल.