तुळशीला बांधा ही एक वस्तू, घरावर कधीच कोणते संकट येणार नाही

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे वृंदावन असते किंवा तुळशीचे छोटेसे रोपटे तर असतेच तुमच्याही घरामध्ये असेलच आपल्या घराची तुळस घराबाहेर असते. त्याच तुळशीला तुम्हाला एक वस्तू बांधायचे आहे.

ज्याने आपल्या घरावर जे संकटे येतील ते त्या वस्तू मुळे आपल्या घरावर येणार नाही. घराच्या बाहेर जर तुळशी एकदम बहरलेली असते त्या घरात समाधान असते. समृद्धी असते. ज्या घरात सुकलेली तुळस असते त्या घरात सुख-समृद्धी नसते. बरकत नसते अशी मान्यता आहे. म्हणून सांगितले जाते की नेहमी आपली तुळशीचे वृंदावन बहरलेले पाहिजे. तर मित्रांनो ही वस्तू तुम्हाला तुळशीला बांधायचे आहे. ही वस्तू कोणती आहे?

तर मित्रांनो तुम्हाला एक पूजेचा लाल धागा किंवा लाल दोरा घ्यायचा आहे. एकदम लाल नसला तरी चालेल रंगीबिरंगी जो आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये किंवा कोणत्याही दुसर्‍या पूजेमध्ये हाताला बांधतो.

तो असला तरी चालेल किंवा दुसरा कोणताही लाल दोरा असेल तरी चालेल. हा दोरा तुम्हाला तुळशीच्या पानाला किंवा तुळशीला बांधायचा आहे. खूप मोठी असेल तर तुम्ही तुळशीच्या रोपाला थोडासा लाल दोरा बांधायचे आहे.

या दोऱ्यामुळे कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा किंवा कोणतीही बाधा कुणी केलेली करणी असू द्या तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. तर असा हा लाल दोरा जर तुम्ही तुळशीला बांधलात तर तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच फरक जाणवेल.

Leave a Comment