ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. त्याशिवाय तो दर १५ दिवसांनंतर नक्षत्र परिवर्तनदेखील करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य २७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजून ८ मिनिटांनी २७ नक्षत्रांपैकी पहिल्या स्थानी असलेल्या अश्विनी नक्षत्रातून भरणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. या नक्षत्रामध्ये तो ११ मे रोजी सकाळी ७ वाजून १३ मिनिटांपर्यंत असेल. भरणी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शुक्र ग्रहाचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात उत्तम परिणाम पाहायला मिळतील.
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन या राशींसाठी सुखकर
मेष
सूर्याच्या भरणी नक्षत्रातील प्रवेशाने मेष राशींच्या व्यक्तींना खूप फायदा होईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच आत्मविश्वास वाढेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ अनेक नव्या संधी उपलब्ध करून देणारा असेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांसोबत प्रवास घडेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय होईल.
सिंह
सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरी व व्यवसायात खूप यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात आर्थिक स्थैर्य लाभेल, गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.