वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. देवगुरु गुरु हा १ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. १२ वर्षांनी हा योग घडणार आहे. तर ३ मे ला देवगुरु वृषभ राशीतच अस्त होणार आहेत.
या संक्रमणाचा सर्व १२ राशींवर परिणाम होईल. पण काही राशी अशा आहेत, ज्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना होणार धनलाभ?
मेष राशी
देवगुरुच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. या काळात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकतो. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकतो. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांना देवगुरुच्या गोचरमुळे अनेक लाभदायी परिणाम मिळू शकतात. नोकरीत मोठा बदल होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला पैसे कमवण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांना देवगुरुच्या गोचरमुळे मोठा धनलाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात.
कन्या राशी
देवगुरुच्या गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांना मुलांकडून कोणतीही आनंदाची बातमी मिळू शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. देश विदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते.
धनु राशी
देवगुरुच्या गोचरमुळे धनु राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात चांगला परतावाही मिळू शकतो.