दहा एप्रिल स्वामी महाराजांचा प्रकट दिवस ;  स्वामींना बोला तुमची कोणतीही इच्छा..

मित्रांनो, स्वामी महाराज हे असे आहे की ते त्यांच्या भक्तांच्या सर्व ईच्छा पूर्ण करत असतात. प्रत्येक संकटात, सुख दुःखामध्ये ते आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे असतात. ते आपल्या भक्तांना जे काही पाहिजे आहेत ते ते मागण्या आधीच देत असतात. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देत असतात. कोणत्याही प्रकारची संकटे त्यांच्यावर ओढवली तर ते त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग देखील सांगत असतात.

 

त्याचबरोबर ते जास्त संकटे आपल्यावर येऊ देत नाहीत. आपल्या भक्तांना नेहमी सुखी समाधानी ते ठेवत असतात व त्यांच्या घरामध्ये धनाची बरकत देखील होत असते. अशा स्वामी महाराजांचा आपल्याला कृपा व्हावी असे वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींच्या प्रकट दिना दिवशी ही सेवा करा व आपल्या इच्छा त्यांना सांगा त्या पूर्ण होतील.

 

स्वामींची कृपा आपल्याला होईल. ही सेवा कशी करावी व स्वामींना आपली मनातील इच्छा कशी सांगावी? याबद्दलचे सर्व माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो 10 एप्रिल हा स्वामींचा प्रकट दिन आहे. त्या दिवशी प्रत्येक स्वामींनी भक्त हे स्वामींची वेगवेगळी प्रकारे सेवा करत असतो. त्यांची पुजा करत असतो. त्याचबरोबर पारायणे केली जाते. याच दिवशी आपल्याला पण एक सेवा करायची आहे व आपल्या मनातील सर्व इच्छा स्वामींना सांगायचे आहेत. जेणेकरून त्या आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील व आपल्याला स्वामींची सेवा केलेला चे भाग्य मिळेल.

 

10 एप्रिल या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपले सर्व कामे आवरून देव पूजा करावी. पूजा केल्यानंतर देवासमोर अगरबत्ती दिवा लावावा व स्वामींना हात जोडून प्रार्थना करावी. आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामींना सांगाव्यात. त्या लवकर पूर्ण व्हावी असे मागणे त्यांच्याकडे मागावे.

 

हे सर्व झाल्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत चे पारायण करायचे आहे. हे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आपल्याला त्या एका दिवसामध्ये वाचायचा आहे. हे वाचताना तुम्ही सकाळी वाचला तरी चालू शकतील. दुपारी वाचला तरी चालू शकते किंवा संध्याकाळी वाचला तरी चालू शकते.

 

जर तुम्हाला संपूर्ण ग्रंथ एकाच वेळी वाचणे शक्य नसल तर तुम्ही तो थोडा थोडा वाटून घ्यावा व प्रत्येक वेळेस जरा जरा वाचावा. म्हणजे सकाळी थोडा दुपारी थोडा आणि संध्याकाळी थोडा अशा पद्धतीने वाचला तरी देखील चालू शकतो. परंतु हा ग्रंथ आपल्याला त्या एका दिवसांमध्येच पूर्ण वाचून काढायचा आहे.

 

अशाप्रकारे ही स्वामींची सेवा करायची आहे व आपल्याला आपल्या मनातील सर्व इच्छा स्वामींना सांगायचे आहेत. नक्कीच सर्व इच्छा आपला लवकरात लवकर पूर्ण होतील.

Leave a Comment